तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 March 2018

सरपंच अनिल गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

महादेव गित्ते
---------------------------------
परळी वैजनाथ, दि.13
नंदनजचे सरपंच अनिल गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कानाची मशिन वाटप तसेच शिक्षण साहित्यांचे वाटप, वृक्षारोपन तसेच श्री केदारेश्वर.महाराज यांना रुद्रअभिषेक करण्यात येणार असल्याचे संयोजक युवा नेते गोविंद गुट्टे यांनी सांगीतले.
नंदनजचे सरपंच अनिल गुट्टे यांचा 15 मार्च रोजी वाढदिवस असून या निमित्त श्री केदारेश्वर महाराज मंदिरात रुद्रअभिषेक, ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबीर, कर्णबधीरांना कानाच्या मशिनचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्यांचे वाटप तसेच गावात वृक्षारोपन करण्यात येणार आहे. सरपंच अनिल गुट्टे मित्र मंडळाच्या वतीने वाढदिवस कार्यक्रम होत असून दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे तसेच ग्रामविकासमंत्री ना. पंकजाताई मुंडे व खा. डॉ.सौ. प्रितमताई मुंडे यांचा आदर्श घेऊन अनिल गुट्टे हे सरपंच म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान, वाढदिवसानिमित्त होत असलेल्या सर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन युवा नेते तथा संयोजक गोविंद
मुंडे यांनी केले आहे.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment