तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 March 2018

मुस्मिमांना सन्मान फक्त भारिप बहूजन महासंघ पक्षामध्येच.....!


फुलचंद भगत
 वाशिम दि.१५: काँग्रेस पक्षांनी मुस्लिम समाजाला आजवर  केवळ गुलामाची वागणूक देऊन फक्त छतरंज्या उचलण्यासाठी मुस्लिम समाजाचा वापर केला,परंतु भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरनीवर चालणारा भारिप बहुजन महासंघ या पक्षाने मुस्लिम समाजाला नेहमी सन्मान देऊन जास्तीत जास्त कार्य कर्त्याला सत्तेत आणले,व राजकारणात सक्रिय केले तेव्हा मी महाराष्ट्रातील  तमाम मुस्लिम समाजासह सर्व  बहुजन समाजाला आवाहन करतो की,त्यांनी मोठ्या संख्येने भारिप बहुजन महासंघामध्ये प्रवेश घेऊन ऍड बाबासाहेब आंबेडकर यांच्या हात मजबूत करावे असे प्रतिपादन भारिप बमसंचे नवनिर्वाचित महाराष्ट्र  प्रदेश महासचिव हाजी मो.युसूफ पुंजनी यांनी वाशिम येथे आपल्या सत्काराला उत्तर देतांना केले. वाशिम येथे स्थानिक विश्रामगृह येथे वाशिम जिल्हा भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते,युसूफ पुंजनी यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या महासचिव पदी मुंबई येथे नुकतीच सर्वांनू मते निवड केली असता त्यांचा आज वाशिम येथे जाहीर सत्कार करण्यात आला.या सत्काराला जिल्हा निरीक्षक खंदारे, जिल्हा महासचिव डॉ नरेश इंगळे,विजय मनवर,राजू दारोकर,रामराव महाराज राठोड, राजाभाऊ चव्हाण,रवी पट्टेबाहादूर,सोनाजी इंगळे,ऍड जहिर,भूषण मोरे नागसेन पट्टेबाहादूर,यांच्यासह सर्व जिल्हा पदाधिकारी,तालुकाध्याक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,यावेळी पुंजनी पुढे बोलताना म्हणाले की,भारिप बहुजन पक्ष हा बहुजनांच्या विचार सरणींनीला धरून चालणारा एकमेव पक्ष आहे,यापक्षांमध्येच सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळते,त्याच बरोबर जातीभेद येथे होत नाही,सर्व पगडजातीच्या लोकांना सोबत घेऊन सत्येच्या प्रवाहात आनणारा पक्ष म्हणजे फक्त भारिप बहुजन महासंघ आहे,सर्व सामान्य जनतेला न्याय देणारा,व दिशा देणारा पक्ष आहे,तेव्हा महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम व बहुजन समाजाच्या लोकांनी भारिप बहुजन महासंघात यावे,व ऍड बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात रुजवावे तेव्हाच हा माझा खरा सत्कार होईल असे मी समजतो,असे यावेळी युसूफ पुंजनी यांनी आपले मत व्यक्त  केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव सोनाजी इंगळे तर आभार भूषण मोरे यांनी मानले.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment