तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

परतूर येथे हज याञे करूसाठी एक दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन

परतूर

येथील खादमीन हुज्जाज हज कमेटीच्या वतीने यावर्षी हजला जाणार्‍या हज यात्रे करूनसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि.15 मार्च गुरूवारी रोजी सकाळी 10 ते 5 यावेळेत करण्यात आल्याची माहिती खादमीन हुज्जाज कमेटीचे हाजी दाऊद खान पठाण यांनी दिली आहे.हे प्रशिक्षण शिबिर नगर पालीकेच्या संस्कृतीक सभागृह बस स्टँड जवळ ठेवण्यात आले आहे.
या शिबिरास प्रमुख पाहूणे व प्रमुख वक्ते म्हणून, खादमीन हज कमेटीचे अध्यक्ष, मौलाना नसीमोदीन मिफ्ताही, मुफती मोहम्मद साहब रांजनी, मौ.मुफ्ती अ.कदीर,तसेच जालना जिल्हा हज ट्रेनर राज मुहम्मद, व हाजी दाऊद खान पठाण, हज ट्रेनर व हाजी अहमद बिन सईद इत्यादी उपस्थित राहणार आहेत, या वर्षात हजला जाणार्‍या भाविकांनी या ट्रेनिंग कॅम्प मध्ये उपस्थित राहून हजचे (अरकान करण्याची) माहिती करून घ्यावी. या शिबिरात प्रमुख वक्ते यांचे मार्गदर्शन होईल, हज याञेला जाणार्‍या सर्वानी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment