तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Monday, 12 March 2018

प्रपंचात भगवान कर्ता ही भावना प्रत्येक व्यक्तीने ठेवावी. हभप रामेश्वरनंदजी महाराज

वैजापुर - सुधीर बागुल

परमात्मा आनंदरूप आहे. भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे. भगवंताच्या
हास्यमुखाचे ध्यान करावे.
प्रपंचात भगवान कर्ता हि भावना ठेवल्यास जिवनाचे सार्थक होत असल्याचे
प्रतिपादन: हभप स्वामी
रामेश्वरनंदजी सरस्वती महाराज (वैसपूर आश्रम)यांनी केले आहेत ते खंडाळा
बिरोबा नगर वस्ती वर
आयोजीत चैतन्य कानिफनाथ महाराज व श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्या
मुर्तीचे प्राणप्रतिष्ठा निमित्त
तिन दिवसीय हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्या निमित महाराज बोलत होते
पुढे बोलतांना महाराज म्हणाले कि प्रत्येक गोष्टीत मनुष्य आनंद पाहात
असतो. उकाड्यात वारा आला,
त्याला वाटते बरे झाले; पाऊस आला की त्याला वाटते, आता गारवा येईल.
कोणत्याही तऱ्हेने काय,
मनुष्य आनंद साठवू पाहात असतो. मनुष्याला भूक लागेल तेव्हा जर अन्न खाईल
तर त्याचे पोट
भरेल आणि त्यापासून त्याला आनंद होईल; परंतु त्याने विष खाल्ले तर त्याने
आनंद न होता मरण
मात्र येईल. तसे आपले होते. आपण विषयातून आनंद घेऊ पाहतो, आणि तो बाधक
होतो. एखाद्या
रोग्याला जर जंत झाले आणि त्याला जर खूप खायला घातले, तर ते शरीराला पोषक
न होता, जंतच
वाढतात; त्याचप्रमाणे आपण सत्कर्मे करताना पोटात विषयांचे प्रेम ठेवून ती
केली, तर त्यामुळे विषयच
पोसले जाऊन, त्यांपासून समाधान लाभू शकत नाही. याकरिता कर्तव्यबुद्धीने
कर्म करावे, म्हणजे ते
बाधक ठरत नाही.मनुष्य जन्मभर जो धंदा करतो त्याच्याशीच तो तद्रूप होऊन
जातो. एखादा वकील
घ्या, तो त्याच्या धंद्याशी इतका तद्रूप होतो की मरतेवेळीसुद्धा तो वादच
करीत जाईल. नोकरी करणारा
नोकरीशी इतका तद्रूप होतो की, स्वप्नात देखील तो स्वतःला नोकर समजूनच
राहतो. कर्म कसे करावे,
तर त्याच्यातून वेगळे राहून. लग्नाचा सोहळा भोगावा, लाडू खावेत, परंतु ते
दुसऱ्याचे आहेत असे समजून.
आपल्या मुलीचे किंवा मुलाचे नाहीत असे मानून; नाही तर व्याह्यांची काळजी
लागायची, किंवा हुंडा मिळतो
की नाही इकडे लक्ष लागायचे. त्यामुळे तापच निर्माण होईल. कर्माशिवाय
कोणालाच राहता येत नाही.
एखाद्याला शिक्षा द्यायची म्हणून, 'अगदी हलायचे नाही, पापणी, हात, पाय,
काहीही हलवता कामा नये,'
असे सांगितले तर ते जसे त्याला शक्य होणार नाही, तसे काही ना काही तरी
कर्म हे होणारच. भगवंतांनी
अशी काही सांगड घालून दिली आहे की कर्म केल्याशिवाय गत्यंतरच नाही. परंतु
ती कर्मे ' राम कर्ता '
ही भावना विसरून केली तर बाधक होतात, आणि मरणापर्यंत माणूस पुढल्या
जन्माची तयारी करीत
राहतो; तेव्हा, देहाने कर्म करतानाही ' कर्ता मी नव्हे ' हे जाणून कर्म
करावे. आपल्याला कर्म केल्याशिवाय
करमत नाही. पण आपण फळाची आशा उगीचच करीत असतो. आपण फळाची आशा सोडून कर्म करू
लागलो, की ते कर्म करीत असतानाच समाधान प्राप्त होते.प्रपंचात
सर्वांकरिता सर्व करावे , पण मनात
मात्र 'मी रामाचा आहे' ही अखंड आठवण ठेवावी, म्हणजेच त्याच्या नामात
राहावे. असेही महाराज म्हणाले.
दि.१० शनिवार रोजी दहा वाजता चैतन्य कानिफनाथ महाराज व श्री गुरुदेव दत्त
महाराज यांच्या प्रतिमेचे
भव्यदिव्य सम्पूर्ण गावातून मिरवणुक काढन्यात आली यात मोठ्या प्रमाणात
भाविक सहभागी झाले होते
त्यानंतर  रात्री नऊ वाजता हभप नवनाथ महाराज पवार यांचे किर्तण तर दि.११
रोजी हभप केशवदादा महाराज उखळीकर यांचे किर्तण झाले भजन हरीपाठ हि या
ठिकानी संपन्न झाले या प्रसंगी
हभप अर्जुन महाराज,हभप रविंद्र महाराज, हभप उत्तम बाबा, ज्ञानेश्वर पवार,
नवनाथ वेळंजकर,रमेश मगर, रामदास  शिंदे,पांडुरंग पवार, किशोर पवार, गणेश
बहाळस्कर,राजेंद्र जानराव, आदी सह परीसरातील भाविक उपस्थित होते

No comments:

Post a Comment