तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 March 2018

शिवसेनेच्या झेंड्याखाली सर्व समाज एकत्र येत आहेत -- बदामराव पंडित

सुभाष मुळे...
---------------------
गेवराई, दि. 4 __ राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाने जनतेला अनेक स्वप्न दाखवून मते मिळवली. सत्तेवर आल्यानंतर मात्र आपले खरे रूप लोकांना दाखवायला सुरुवात केली. आज शेतकरी, बेरोजगार, व्यापारी, सामान्य माणूस अडचणीत आहे. त्यांना प्रत्यक्ष मदत करण्याऐवजी भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करीत असल्याने आता लोकांचा सरकारवरच विश्वास उडाला असून आपल्या मदतीला फक्त शिवसेनाच येत असल्याने सामान्य जनता आता सेनेत सहभागी होऊन भगवा हाती घेत असल्याचे प्रतिपादन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले. तर काँग्रेस, राष्ट्रवादी कडून कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचार झाल्याने त्यांना कंटाळलेले लोक, सद्याच्या सरकारवरही योग्य निर्णय घेत नसल्याने प्रचंड नाराज आहेत. त्यांच्याकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सर्व समाजबांधव आता शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र येत असून, राज्यात शिवसेनेचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केला.
          गेवराई मतदार संघातील माळापुरी येथे दि. ३ मार्च रोजी सर्व समाजाच्या युवकांनी एकत्र येऊन शिवसेनेची शाखा स्थापन केली, यावेळी बदामराव पंडित हे बोलत होते. कार्यक्रमास माजी सभापती पंढरीनाथ लगड, बाळासाहेब जटाळ, विश्वंभर सावंत, किरण गावडे, कल्याण तळेकर, भाऊसाहेब घाटूळ, सुरेश जैन, सुनील कांडेकर, कांताराव ढास, सरपंच अय्युबभाई, इम्रान पठाण, अफसर बेग, मचिंद्र पडुळे, लियाकत बेग, अकबर बेग, मोहनसिंग ठाकूर, नईम बेग, भारत परदेशी, रहीम बेग, शहादेव तिपाले आदींची प्रमुख उपस्थिती होती. शाखाप्रमुख मिर्जा राजू बेग, उपप्रमुख बालाजी ढास, सचिव नानाभाऊ पडुळे, प्रल्हाद धुताडमल, शेख फारुख, जालिंदर गिरी, वसीम बेग, जुनेद बेग, रामराव तिपाले, गंगाराम पडुळे, अफसर बेग, समीर बेग, गोकुळ ढास, रियाज बेग बाळू डोईफोडे आदींनी उपस्थितांचे स्वागत केले. पंढरीनाथ लगड यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. पुढे बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पुढारी यांनी राज्यातील शेतकऱी यांना झुलवत ठेवले आणि आपल्या तिजोऱ्या भरल्या म्हणूनच जनतेने त्यांना सत्तेतून पायउतार करत घरी बसवले, परंतु नंतर आश्वासनाची खैरात वाटून सत्तेवर असलेले भाजप सरकार आजही कोणती ठोस भूमिका न घेता केवळ घोषणाबाजी करून जनतेला स्वप्न दाखवत आहेत. शेतकऱी यांना सरसकट कर्जमाफी नाही, कापूस बोण्डअळी ग्रस्ताना मदत नाही, पिकांचा हमीभाव मिळत नाही, उसाला भाव नाही, युवकांना नोकऱ्या नाहीत, ठोस विकासाची कामे दिसत नाहीत तरीही छाती बडवत विकासाच्या मोठ्या गप्पा मारल्या जात आहेत. यामुळे सामान्य माणूस पार वैतागला आहे. याउलट सामान्यांच्या हिताचे निर्णय सरकारला घेण्यास भाग पाडण्यासाठी सत्तेत असूनही शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करत न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहे. म्हणूनच आज गावागावात शिवसेनेची शाखा स्थापन होत असून घराघरात शिवसैनिक निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्यात शिवसेनेची सत्ता येणार असून बदामराव पंडित हे मंत्री होतील असा विश्वासही जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment