तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Sunday, 11 March 2018

गेवराईच्या गोदावरी मल्टिस्टेटला नॅशनल अॅवार्ड पुरस्कार प्रदान

सुभाष मुळे....
----------------------
गेवराई, दि. 12 __ पुणे येथील फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने बॅंकींग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गेवराई येथील गोदावरी मल्टिस्टेट को. ऑप. या बॅंकेस नॅशनल अॅवार्ड हा पुरस्कार सन्मानपुर्वक
प्रदान करण्यात आला आहे.
           बीड येथील हाॅटेल साई पॅलेस हाॅटेलच्या भव्य हाॅल मध्ये राज्य स्तरिय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रिय निबंधक डॉ. सय्यद हसन अब्बास हे होते. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, मल्टिस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशराव वाबळे, सहकार न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती एम. आर. मकरे, फेडरेशनच्या मुख्‍य अधिकारी सुरेखा लवांडे, चार्टर्ड अकौंटट सचिन शिंदे, आदी उपस्थित होते. दोन सत्रात झालेल्या या सहकार परिषदेत बॅंकींग व सहकार विषयी यथोचित मार्गदर्शन झाले. सन. 2017 मध्ये भारतातील उत्कृष्ट बॅंकींग कार्य करणाऱ्या सहा मल्टिस्टेट सोसायटीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये बीड जिल्ह्य़ातून गेवराईच्या गोदावरी मल्टिस्टेट या एकमेव संस्थेस नॅशनल अॅवार्ड 2017 देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. याप्रसंगी बुलढाणा अर्बन बँकेचे डॉ. सुखेज झंवर, कडुभाऊ काळे, संतोष भंडारी, कपाळे आप्पा, जयसिंह पंडित, जयप्रकाश निंबाळकर, राहुल महाडिक, साईनाथ परजणे, चंद्रकांत शेजुळ, संजय तळतकर, रवी कानडे, अजिनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्र? कर्नाटक राज्यातील सर्व मल्टिस्टेट पतसंस्थेचे चेअरमन, प्रशासकीय अधिकारी, संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
           गोदावरी मल्टिस्टेटला यापूर्वी अहमदनगर येथील विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते अर्थरत्न तसेच औरंगाबाद येथे कमल किशोर कदम यांच्या हस्ते मराठवाडा भुमिपुत्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. प्रभाकरराव पराड , मधुकर वैष्णव, प्रवीण पंडित, गणेश शहाणे, व्यवस्थापक रामनारायण मोटे, प्रल्हाद वाघ आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. या प्राप्त पुरस्काराबद्दल पत्रकार संघाचे सुभाष मुळे, मधुकरराव तौर, गणेश क्षीरसागर, दिनकर शिंदे तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. झालेल्या या समारंभाचे सुत्रसंचलन माधव चाटे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार जयसिंह पंडित यांनी मानले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment