तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 1 March 2018

विद्यापीठ लोकप्रशासन अभ्यास मंडळावर डाॅ. कल्पना घारगे

सुभाष मुळे...
----------------------
गेवराई, दि. 1 __ जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथिल महिला महाविद्यालयाच्या लोकप्रशासन विषयाच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. कल्पना घारगे यांची नुकत्याच झालेल्या विद्यापीठ अभ्यास मंडळाच्या निवडणूकीत विजय  झाला.
     अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लोकप्रशासन अभ्यास मंडळाच्या निवडणूकीत डाॅ. कल्पना घारगे विजयी झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात येऊन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांचन परळीकर यांच्या हस्ते प्रा. डॉ. कल्पना घारगे यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. भिष्मा रासकर यांनी प्रास्तविकपर मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या वतिने डॉ. कल्पना घारगे यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांचन परळीकर यांनी हा विजय महाविद्यालयास अभिमानास्पद असल्याचे सांगितले. दरम्यान प्रा.डाॅ. कल्पना घारगे यांचा महाविद्यालयाच्या वतिने सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देतांना त्या म्हणाल्या की, हा विजय माझा वैयक्तिक नसून आपल्या महाविद्यालयाचा आहे. निवडणूकीत आपणास प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सहकारी कर्मचाऱ्यांचे डाॅ. घारगे यांनी यावेळी ऋण व्यक्त केले.
   सत्कारास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रा. इनामदार व आभार प्रदर्शन प्रा.डाॅ. संगीता आहेर यांनी यावेळी केले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment