तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

वटकळी पाटीवर एस.टी.बस थांबविण्यासाठी हाँटेलवाल्याकडुन चालक व वाहकाला फुकटात नाश्ता


विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- सेनगांव हे तालुक्याचे ठिकाण असुन येथे एस.टी.चे बसस्थानक आहे परंतु हिंगाेली,नांदेड,परभणी वरुन आलेल्या बस बसस्थानकात न थांबता त्वरीत पलटुन त्या वटकळी पाटीवर फुकटचा  नाश्ता व चहासाठी तासनतास थांबतात यामुले प्रवाशी वर्गातुन संताप व्यक्त केला जात आहे.
सविस्तर माहीती अशी की,सेनगांव तालुका होऊन आज तब्बल 22 वर्ष लोटले असुन अजुन ही सेनगांव बसस्थानकाचा विकास झाला नसुन येथे शौचालय व मुतारी घर आहे मात्र पाण्याच्या नियोजनामुले व कर्मचार्याच्या कमतरेमुले बंद आहे. यामुले महिला प्रवाशांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. या बसस्थानकात  अकोला,परभणी,नांदेड,शेगांव,औरंगाबाद,हिंगोलीयासह अनेक लांबपल्याच्या गाड्यासह शट्टल गाड्या धावतात परंतु या बसचे वाहक व चालक आपली बस सेनगांव बसस्थानकात घेऊन येताच बसमधील प्रवासी उतरताच बस त्वरीत पलटवतात.एखादा वयस्कर प्रवाशी असल्याने त्याला बस पर्यंत जाण्यास वेल लागतो परंतु बसचे वाहक व चालक तो वयस्कर प्रवाशी येईपर्यंत निघुन जातात व नंतर त्या वयस्कर प्रवाशाला दुसरी बस येईपर्यंत ताटकलत बसावे लागते. सेनगांव तालुक्याच्या ठिकाण असलेल्या बसस्थानकात बस न थांबवता ती जवलच्याच वटकळी पाटीवर तासनतास थांबवतात त्याला कारण ही तसेच आहे. वटकळी पाटीवरील एका हाँटेलवाल्याकडुन वाहक व चालकाला फुकटात नाश्ता,सिगारेट,आर.एम.डी.गुटखा,चहा मिलतो. कारण एस.टी.बस थांबल्याने बसमधील प्रवाश्यांची हाँटेलमध्ये एकच झुबंड उडत असल्याने हाँटेलवाल्यांचा धंदा वाढतो. एखाद्याला नाश्ता करायचा नसतो मात्र बसचे वाहक व चालक तब्बल तास अर्धातास बस येथेच ऊभी करतात त्यामुले नाईजालाने चहा तरी घेतो. बसस्थानकात थांबायला वाहक व चालकांना वेल नसतो मात्र वटकळी पाटीवर फुकटात नाश्ता,सिगारेट,गुटखा मिळत असल्याने येथे मात्र वेल मिलतो. बस थांबल्याने हाँटेलवाल्यांचा व वाहक,चालकांचा फायदा मात्र प्रवाशी वर्गांना अगाऊच आर्थिक नुकसान. या प्रसंगाने अनेक वेला प्रवाशी व वाहक,चालकात बाचाबाची झाल्याची उदाहरणे आहेत. या प्रकाराकडे मात्र लोकप्रतिनीधी,राजकारणी स्वत:ला नेते म्हणुन घेणारे मात्र दुर्लक्ष का करतात हे मात्र कलायला मार्गच नाही. तरी परीवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी त्वरीत लक्ष देऊन परीवहन महामंडलाची बस ही वटकळी पाटी ऐवजी  सेनगांव बसस्थानकातच ऊभी राहावी. जेणे करुन वयस्कर प्रवाशांना सुककर प्रवास होईल.

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर
तेजन्युज हेडलाईन्स वेब वाहिनी सेनगांव तालुका प्रतिनीधी
मो.व्हाँट्सएप:- 9604948599

No comments:

Post a Comment