तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 March 2018

महावितरणच्या समस्याबाबत निवेदन


प्रा. डॉ. संतोष रणखांब तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : शहरात तसेच तालुक्यात महावितरणच्या भोगळ कारभाराचा निषेध करत तरुणांनी आंदोलनाचा इशारा एका निवेदनातून दिला अगेह. तहसील कार्यालय मंडळ अधिकारी विठ्ठल पिंपळे व महावितरणचे उप अभियंता कैलास फड यांना हे निवेदन देण्यात आले आहे.
महावितरणच्या विद्युत बिलात अनंत चुका असून त्या दुरुस्ती करण्या ऐवजी चुकीचे अव्वाच्या सव्वा बिले वसूल करण्यात येत आहेत किंवा विज पुरवठा खंडित करण्यापुर्वी 15 दिवसाची नोटिस न देता विज पुरावठा खंडित करण्यात येत आहे. वसुली कर्मचारी हिटलर सारखे वागत असुन तात्काळ बिल भरा, तुमच्या वरती गुन्हे दाखल करु अशा धमक्या देऊन ग्राहकांना वेठिस धरत आहेत, महावितरण ची सेवा हि शहरात काय तालुक्यात हि अनेक अनंत तक्रारी असुन तक्रार निवारण करण्यासाठी कर्मचारी संख्या वाढवा व शहरात मध्यवर्ती ठिकाणी केंद्र उभारा तसेच 12 विवीध मागण्या केलेल्या आहेत. या मागण्या 15 दिवसात मान्य न केल्यास आपल्या वसुली पथकास शहरात व तालुक्यात कोठेही फिरु देणार नाही व या विरोधात आंदोलन करण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल असा इशारा दिला आहे.यावेळी उप आभियंत्यांनी बोलतांना दुरुस्ती अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे खोळंबली आहे परंतु वसुली वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या आदेशानुसार चालु आहे,यावेळी सर्व तरुणांनी आमचे निवेदन वरिष्ठांना पाठऊन मार्ग काढावा, तुम्ही सहकार्य करा आम्ही सहकार्य करतो, असे स्पष्ट केले. यावेळी ब्राह्यण गल्लीत व राज गल्लीत कमी व्होल्टेज ची अडचण असल्याचे सांगताच नगर परीषदेने जागा देताच नविन डि.पी.बसवण्याक येणार असल्याचेही महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.
या निवेदनाच्या प्रति मा.सह व्यवस्थापक संचालक, प्रादेशिक महावितरण कार्यालय, औरंगाबाद, मा.मुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी परभणी, मा.अधिक्षक अभियंता, परभणी आदिंना दिले आहे.निवेदनावर बळीराम काटे, नारायन रोडे, आकाश चव्हाण, शेख फैरोज, जावेद शेख, साजेद कुरेशी,मोहन काटे आदि प्रमुखाच्या सह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment