तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Wednesday, 14 March 2018

मुंबईच्या विविध प्रश्नांवर राज्य विधानसभेत झालेल्या चर्चेला आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले

ऊत्तर या उत्तरातील महत्त्वाचे टप्पे
प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई : दि १५ मुंबईचा विकास आराखडा 2 ऑगस्ट 2017 रोजी आम्हाला प्राप्त झाला आहे. नगररचना संचालक यांनी त्यांच्याकडील प्रक्रिया पूर्ण करून तो राज्य सरकारला 2 फेब्रुवारी 2018 रोजी सादर केला आहे. याला मंजुरी देण्यासाठी राज्य सरकारकडे 2.5 वर्षांचा वैधानिक कालावधी आहे. मात्र त्यावर त्वरेने निर्णय घेण्याचे सरकारने ठरविले असून, मार्च 2018 पर्यंतच त्याला मंजुरी दिली जाईल.
- या विकास आराखड्यात कोळी पाडे आणि आदिवासी पाडे यांचे हित जपण्यात येईल. सीओडी तसेच फनेल झोनप्रभावित क्षेत्रातील इमारतींच्या पुनर्विकासासंबंधी सुद्धा स्वतंत्र तरतुदी त्यात असतील.
- मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती ही अन्य महापालिकांच्या तुलनेत चांगली आहे. त्यामुळे 700 चौ.फुटापर्यंतच्या गाळ्यांना मालमत्ता करातून सूट देण्यासंदर्भातील प्रस्ताव सर्व वैधानिक पूर्तता करून महापालिकेने पाठविला, तर त्याला मंजुरी देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे.
- मुंबईमध्ये घरांची मागणी ही साधारणपणे 20 लाख आहे. यातील 50 टक्के मागणी ही एमएमआर क्षेत्रात आहे. आजच्या तारखेत 5 लाख घरे ही मंजुरी/निर्माणाधीन आहेत.
- मुंबई महापालिकेला जीएसटी अनुदान म्हणून अतिरिक्त 600 कोटी रूपये राज्य सरकारने आणि वेळेवर दिले आहेत. विकास दराच्या 8 टक्के ही रक्कम आहे.
- बीआयटी चाळ पुनर्विकासाच्या एकूण 67 प्रकल्पांपैकी 51 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
- चेंबूर आणि सुभाष नगरातील 26 पुनर्विकास प्रकल्पांपैकी 10 प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून, 6 निर्माणाधीन आहेत.
- मुंबईतील नागरी विकास हा पुनर्विकासाच्या माध्यमातूनच शक्य आहे आणि त्यावर आपले सरकार काम करीत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सुद्धा खाजगी सहभाग आणि एसपीव्हीच्या माध्यमातून सरकार काम करते आहे.
- रेल्वेमार्ग आणि रेल्वेच्या जागांवर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहेत. त्यांच्या पुनर्विकासासाठी रेल्वे आणि एसआरएच्या मदतीने आम्ही काम करतो आहोत. ज्यातून पुनर्विकास तर होईलच, शिवाय, रेल्वेच्या जागाही खुल्या होतील.

No comments:

Post a Comment