तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

पांडवउमरा ग्राम पंचायतच्या वतीने प्रविण पट्टेबहादुर यांचा सत्कार


फुलचंद भगत
वाशिम -- येथून जवळच असलेल्या  ग्राम पांडवउमरा ग्राम पंचायत च्या वतीने 'आमचं गांव आमचा विकास' या उपक्रमाचे मास्टर ट्रेनर प्रविण पट्टेबहादुर यांचा शाल , पुष्पहार घालुन येथील ग्राम पंचायत चे सदस्य,रोजगार सेवक ग्रामसेवक ,सरपंच यांनी केला आहे.
        'आमचं गांव आमचा विकास' या उपक्रमांतर्गत एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत मास्टर ट्रेनर प्रविण पट्टेबहादुर यांनी कार्यशाळेत बोलतांना सांगितले की,14 वा वित्तआयोग हा गांव विकासाचा केंद्रबिंदू आहे.यामुळे शिक्षण,आरोग्य,उपजीविका हे घटक सक्षम होण्याला देखील मदत या 14 व्या वित्तआयोगातुंन होणार आहे.खरोखर हा 14 वा वित्तआयोग ग्रामविकासाचा चेहरा मोहरा बदलून टाकणारा असा हा आयोग आहे. लोकसंखेच्या आधारावर हा निधी येत असतो.हा आलेला निधी विविध घटकावर खर्च होणार असल्याची माहिती यावेळी प्रविण पट्टेबहादुर यांनी दिली.या कार्यक्रमाला उपस्थित सरपंच सौ सिमा संतोष ढोबळे,उपसरपंच रामकृष्ण भोयर,ग्रा.प.सदस्य अमोल खिल्लारे, यांचे सह गावातील नागरिक उपस्थित होते.या कार्यशाळेला दिनकर खिल्लारे,अंगनवाडी सेविका,आशा वर्कर, मदतनिस,शिक्षक ग्राम पंचायत चे कर्मचारी संदीप कांबळे,रोजगार सेवक,डाटा एंट्री ऑपरेटर यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येथील ग्रामसेवक सतीश इडोळे यांनी केले तर  प्रविण प्रशिक्षक म्हणून ग्रामपंचायत ने सत्कार केल्याबद्दल प्रविण पट्टेबहादुर यांनी आभार मानले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment