तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 March 2018

करम ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत सौ. अनिता प्रकाश धुमाळ विजयी


परळी दि. 03 : येथून जवळच असलेल्या करम ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या पोट निवडणुकीत सौ. अनिता प्रकाश धुमाळ या 94 मतदान  अधिक घेवून विजयी झाल्या आहेत. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा सहज पराभव केला आहे.
करम (ता.सोनपेठ) येथील वार्ड क्र. 1 मधील ग्रामपंचायत पदासाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले व 28 फेब्रुवारी रोजी सोनपेठ येथे मतमोजणी झाली. या वेळी सौ. अनिता प्रकाश धुमाळ या 94 मताने विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. निकालानंतर करम येथे सौ. अनिता धुमाळ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. करम गावच्या मतदारांमुळेच व ग्रामस्थांनी सहकार्य केल्यामुळेच आपला विजय झाला आहे. मतदारांच्या विश्वासास पाञ राहील व गावच्या विकासाठी कटीबध्द राहू अशी ग्वाही सौ. अनिता धुमाळ यांनी दिली.  दरम्यान अनिता धुमाळ यांचे परळीत ही स्वागत करण्यात आले.

No comments:

Post a Comment