तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 March 2018

हेलस येथे श्री कालिंकादेवी वार्षिक यात्रौत्सव

कीर्तन, प्रवचनासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

राम सोनवने
सेलू/हेलस (ता.मंठा) येथील  श्री कालिंकादेवीचा वार्षिक यात्रौत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त मंगळवारपासून ( ता. २०) गुरुवारपर्यंत ( ता. २२ )  तीन दिवस
कीर्तन, भजन, प्रवचनासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वार्षिकोत्सवाचे हे पस्तीसावे वर्ष आहे. हेलस येथील विविध प्राचिन मंदिरांपैकी श्री कालिंकादेवीचे मंदिर हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमूना आहे. मराठवाड्यासह विदर्भातील अनेक कासार समाज व अन्य समाज बांधव मोठ्या श्रध्देने दरवर्षी उत्सवात सहभागी होत असतात.

उत्सवकाळात दररोज सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजता श्री कालिंकादेवीस चढाव , अभिषेक, महापूजा व आरती, तर सायंकाळी सात वाजता आरती होणार आहे.
मंगळवारी (ता. २०) सायंकाळी चार वाजता सुभाषराव कुंभकर्ण, आबासाहेब पानपट, सुंदर साळवे,सचिन काटकर, सनतकुमार वानरे, राजू कानडे यांच्याकडून आराधना आहे. रात्री नऊ वाजता रामेश्वर महाराज, मंठा यांचे कीर्तन आहे.

बुधवारी (ता. २१) शाम वानरे, डॉ.संजय मेने , डॉ. मंगेश महाजन, संदीप ढोके, प्रकाश वानरे, डॉ.श्रीकांत दहिभाते यांची आराधना आहे. रात्री नऊ वाजता माणिक महाराज मांगुळकर यांचे कीर्तन होणार आहे.

गुरूवारी २२ मार्च रोजी पंढरीनाथ हेलसकर, सौ.आशामती दिलीप खेत्रे , दत्तराव खराबे, सुभाष दहिभाते, गजानन  खराबे, पूर्वा कुमार कुंभकर्ण यांची आराधना आहे.
उत्सवकाळातील धार्मिक विधींचे पौराहित्य आबासाहेब शिलवंत करणार आहेत. भाविकांच्या चहापान, अल्पोपहार व जलसेवेची अनेक भक्तांनी व्यवस्था केली आहे. दररोज महाप्रसाद होणार आहे. उत्सवकाळातील विविध कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष सतीश तळणीकर, उपाध्यक्ष सुभाष दहिभाते, सचिव बाबासाहेब हेलसकर, बालासाहेब दहिभाते व सदस्यांनी केले आहे. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी श्री कालिंका महिला मंडळ, नवयुवक मंडळ व श्री गणेश भजनी मंडळ पुढाकार घेत आहे.

No comments:

Post a Comment