तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 March 2018

शिष्यवृत्तीधारक व इ.बी.सी.धारक विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवा;

ऑनलाईन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची प्रचंड आर्थिक लुट-प्रा.डॉ.विनोद जगतकर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेनुसार अनुसूचित जाती व जमाती इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळत असते मात्र यावर्षी शैक्षणिक वर्ष संपत आले असून फॉर्म दाखल करुन घेतले जात नाहीत. त्यामुळे शिष्यवृत्ती कधी मिळणार याबाबत अनिश्यतता आहे. होतकरु गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यावे हा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे. ऑनलाईन  फॉर्म  भरुन  घेण्याच्या नावाखाली वेगवेगळी इंटरनेट  कॅफेधारक विद्यार्थ्यांची सर्रास आर्थिक लुट ही करत आहेत. 

      तरी ही फॉर्म भरण्याची मुदत वाढवून फॉर्म हे माहविद्यालयानी भरुन घ्यावेत व विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड व परवड थांबवावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस समाजिक न्याय विभागाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा तीव्र इशारा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डा.विनोद जगतकर यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment