तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 March 2018

जि. प. शाळेत जागतिक ग्राहक दिन साजरा


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ येथिल जि. प. प्रशालेत जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते  म्हणून किरण पतंगे,प्रमुख पाहुणे, अ. भा. ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष किरण स्वामी, सचिव  राधेशाम वर्मा अ.भा.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुमित लांडे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात जग प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हाँकिंग सर्वांनी दोन मीनीटाचे मौन पाळुन श्रदांजलीने केला. प्रमुख वक्ते किरन पतंगे यांनी ग्राहक व उपभोक्ता या विषयी मार्गदर्शन केले. किरन स्वामी,संदिप लष्करे व सुमित लांडे यांनी ग्राहकांच्या अडीअडचणी व उपाय योजना यावर चर्चा केली.यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकिय सदस्य पदी निवडीबद्दल किरण स्वामी यांचा तसेच जर्नालिस्ट युनियन आँफ महाराष्ट्र राज्य कार्यकारीनी सदस्यपदी निवडीबद्दल राधेशाम वर्मा यांचा सत्कार मुख्याध्यापक सुमित लांडे यांनी केला.यावेळी सहशिक्षक कदम, गोरवे , स्वामी, सौ. रोडे, सौ. राठोड यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.सुत्रसंचालन प्रशिक्षक शेख वाजेद यांनी तर आभार शुभम भोसले यांनी मानले.

No comments:

Post a Comment