तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 1 March 2018

शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणाला विरोध

करण्यासाठी आझाद मैदान, मुंबई येथे बुधवार दि. ७ मार्च २०१८ रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे
प्रतिनिधी :बाळासाहेब राऊत
मुंबई :दि ०२
महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी आझाद मैदान, मुंबई येथे बुधवार दि. ७ मार्च २०१८ रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 
राज्यातील सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदार  धरणे आंदोलनात सहभागी होऊन महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीला पाठिंबा देणार आहेत. 
सर्व जि.प./ खाजगी/ न.पा./म. न. पा.मधील प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, शिक्षण संस्थाचालक, माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सिनिअर /ज्युनिअर कॉलेज प्राचार्य, शिक्षक बंधू-भगिनींनी तसेच शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते, पालक-विद्यार्थी, अंगणवाडी सेविका यांनी धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही विनंती. 

ठिकाण - आझाद मैदान, मुंबई.
बुधवार, दि. ७ मार्च २०१८.
वेळ - सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत.

आपले
मा. आमदार शिवाजीराव पाटील
राज्याध्यक्ष -राजाराम वरुटे
राज्य सरचिटणीस- केशवराव जाधव
समन्वयक-मधुकर काठोळे
राज्य सल्लागार -बाळासाहेब काळे, दि.रा.भालतडक, माधवराव पाटील, वसंतराव हारुगडे, विजय बहाकर, लायक पटेल, तुकाराम कदम
राज्य कार्यकारिणी, व जिल्हा, तालुका, न. पा./ म.न.पा.अध्यक्ष,सरचिटणीस व कार्यकारिणी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
वक़्त की पुकार है, मिल के चलो!
             लढेंगे, जितेंगे!

No comments:

Post a Comment