तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

हिंगाेली जिल्ह्यात सेनगांव तालुका पल्स पाेलीओ माेहिमेत आघाडीवर

२३ हजार ८५८ बालकापैकी २२ हजार १४७ बालकांना लस देण्यात आली

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- दि.११ मार्च रविवार राेजी राबविण्यात आलेल्या पल्स पाेलीओ माेहिमेस तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असुन ० ते ५ वर्ष वयाेगटातील एकुण २३ हजार ८५८ बालकापैकी २२ हजार १४७ बालकांना लस देण्यात आली असुन याची टक्केवारी ९४ टक्के आहे़. हिंगाेली जिल्ह्यात मागास असलेला सेनगांव तालुका या माेहीमेत आघाडीवर आहे.
सेनगांव तालुका आराेग्य अधिकारी डाँ.नामदेव काेरडे यांच्या नियाेजनबध्द मार्गदर्शनाखाली दि.११ मार्च रविवार राेजी सेनगांव तालुक्यात पाेलीओ लस माेहीमेस सुरुवात झाली असुन तालुक्यातील २३ हजार ८५८ बालकापैकी २२ हजार १४७ बालकांना लस देण्यात आली. तालुक्यात एकुण १८४ बुथ स्थापन करण्यात आले हाेते त्या ठिकाणी विविध मान्यवरांनी पल्स पाेलीओ बुथवर जाऊन पल्स पाेलीओचे उदघाटन केले. पानकनेरगांव येथे हिंगाेली जि.प.चे शिक्षण सभापती संजयभैया देशमुख, कवठा येथे जि.प.सदस्या कल्पनाताई घाेगरे,वरुड (चक्रपान) येथे पं.स.सदस्य रायाजी चाेपडे,सरपंच मंगलाताई काेटकर,केलसुला येथे जि.प.सदस्या चंद्रभागाबाई देवराव जाधव,सेनगांव येथे हिंगाेली जिल्हा चिकीत्सक डाँ.आकाश कुलकर्णी,डाँ.नामदेव काेरडे, खुडज येथे सेनगांव शिवसेना उप तालुकाप्रमुख माजी पं.स.सदस्य पांडुरंग (पिंटु) गुजर,कापडसिंगी येथे सरपंच कैलास हराळ,बन येथे सरपंच सुमनबाई वाघ,गाेरेगांव येथे पं.स.सदस्य अशाेक कावरखे,आजेगांव येथे सरपंच वैशाली चाटसे,केशवराव भालेराव,उपसरपंच देविदास आण्णा वाघ,पुसेगांव येथे जि.प.सदस्या रत्नमाला खंदारे,साखरा येथे डाँ.मेश्राम,हेळकर,बाेंदवाड,जामठी येथे मधुकर जामठीकर,पारडी पाेहकर येथे पं.स.सभापती स्वाती गजानन पाेहकर,सि.एस.चन्ने,बाभुळगांव येथे ममता वडकुते,किशाेर वडकुते,रघुविर हनवते आदींनी पाेलीओ बुथचे उदघाटन केले. विशेष म्हणजे तालुक्यातील प्रत्येक बुथवर तिरंगी फुग्यांनी सजविल्यामुळे बुथवर लहान बालकांना जसे वातावरण पाहीजेत तसेच वातावरण या फुग्यामुळे तयार झाल्याने बुथवर लस घेण्यासाठी बालकांची गर्दी पाहावयास मिळाली. सेनगांव तालुक्यात आराेग्य विभागाचे कर्मचारी आता डाेर टु डाेर चालले असुन शेतातील आखाड्यावर जाऊन ही राहीलेल्या बालकांना लस देत आहेत. दि.१३ मार्च मंगळवार राेजी ३९० बालकांना व दि.१४ मार्च बुधवार राेजी ३१७ बालकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात आली. तरी सेनगांव तालुक्यातील ० ते ५ वयाेगटातील राहीलेल्या सर्व बालकांना लस देण्याचे आवाहन आराेग्य अधिकारी डाँ.नामदेव काेरडे यांनी केले आहे.

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर
तेजन्युज हेडलाईन्स वेब वाहीनी सेनगांव तालुका प्रतिनीधी
माे/व्हाँट्सएप:- 9604948599

No comments:

Post a Comment