तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 March 2018

महाराष्टातील सर्वात मोठे देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूरच्या विठोबाचे नाव वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये सामील


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई : दि २ महाराष्टातील सर्वात मोठे देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूरच्या विठल रुख्मीनी मंदिर समितीला वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये सामील.एका दिवसामध्ये सर्वात जास्त लोकांनी आषाढी एकादशीला लावली हजेरी वर्ल्ड बुक रेकॉर्डचे चेअरमन दिवाकर सकुल तसेच वीरेंद्र शर्मा यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले .
पंढरपुर विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचादेव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात पंढरपूरमध्ये वर्षातून चार एकादश्यांना चार यात्रा भरतात - चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणार्या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात.
विठोबा हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आलेला व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. त्याचा अवतार हा गयासुर नावाच्या राक्षसाच्या समूळ नाश करण्यासाठी द्वापार युगात झाला होता. त्यावेळी गयासुर अरीने सत्यश्रेष्ठ धर्माचा नाश करण्यासाठी देव गणांना भुलवण्याचे तथा गो-ब्राम्हण हत्येचे अखंड सत्र चालवले होते. यास्तव श्री मन्महा मूळ जगत्पित्याच्या आज्ञेने श्रीहरीने बौध्य नामे अवतार घेऊन गयासुराला अग्निकुंडात जाळून भस्म केले होते . नंतर त्याचा परमभक्त जो पुंडलिक यास भेटून स्वरूप दाखविले होते आणि मातापित्याची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास पात्र केले होते.

No comments:

Post a Comment