तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Monday, 12 March 2018

रामायण आपल्या जीवनाला आकार देते-सौ.सरोजनीताई हालगे

कल्याणकारी हनुमान मंदिर परिसरात रामलिला कार्यक्रमास प्रारंभ

महादेव गित्ते
---------------------------------
परळी वैजनाथ, दि.12

   रामायण, महाभारत या केवळ कथा नाहीत तर यातून आपल्या जीवनाला घडविण्याचे,
आकार देण्याचे काम केले जाते. राम कथेतील बंधु भाव कसा असावा, तो कसा
जोपासावा, मैत्री कशी असावी याचे धडे दिले जातात. रामकथा ही खऱ्या
अर्थाने मानवी जीवनाला चांगले संस्कार देणारी कथा आहे असे मत नगराध्यक्षा
सौ.सरोजनीताई हालगे यांनी व्यक्त केले. दरम्यान राम कथेतून भारतीय
संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडते असे मत वैद्यनाथ देवस्थानचे सचिव राजेश
देशमुख यांनी व्यक्त केले.
श्री कल्याणकारी बहुउद्देशीय प्रतिष्ठाण, नविन माणिकनगर परळीच्या वतिने
श्री रामनवमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रामलिला कार्यक्रमाचे
उद्‌घाटन नुकतेच करण्यात आले. नवी दिल्ली, उत्तर भारत, मध्यप्रदेश अशा
ठिकाणी होणारी रामलिला परळीत प्रथमच उपलब्ध करण्यात आली असून नाट्य
स्वरूपातील रामलिला 25 मार्चपर्यंत चालणार आहे. आज झालेल्या उदघाटन
कार्यक्रमास उदघाटन म्हणून नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे तर अध्यक्ष
म्हणून वैद्यनाथ देवस्थानचे सचिव राजेश देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून
जागृती  मल्टीस्टेटचे अध्यक्ष प्रा.गंगाधर शेळके, उपनगराध्यक्ष आयुबखान
पठाण, नगरसेवक शरद मुंडे, डॉ.मधुसूदन काळे, वकील संघाचे अध्यक्ष
ऍड.राजेश्वर देशमुख, रा,कॉं.चे न.प.चे गटनेते वाल्मीक कराड,
ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, बांधकाम सभापती शेख शरीफ, सुर्यकांत
मुंडे, प्राचार्य डॉ.आर.एस.बांगड, मोहन सोळंके, बाशीतभाई, पत्रकार संघाचे
अध्यक्ष धनंजय आरबुने, भाउड्या कराड, शकीलभाई कुरेशी, संजय खाकरे आदींसह
अनेकजण उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत कल्याणकारी बहुउद्देशीय
प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुरेश टाक, सचिव बाजीराव धर्माधिकारी तसेच
समितीच्या सर्व सदस्यांनी केले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते श्रीराम आरती
करण्यात आली. दरम्यान सलग दोन दिवसांपासून या कार्यक्रमाला भाविकांची
मोठी गर्दी होत असून उत्तर भारतातील रामलिला पाहण्याची चांगली संधी
उपलब्ध करून दिल्याबद्दल भाविकांनी संयोजकांचे आभार व्यक्त केले आहे.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment