तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ( ई नाम )या राष्ट्रीय कृषी पोर्टलशी जोडण्याची अर्थसंकल्पात घोषणा


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई : दि. १२ राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ( ई नाम )या  राष्ट्रीय कृषी पोर्टलशी जोडण्याची अर्थसंकल्पात घोषणा केली .
हजारो रुपये खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला कधी फळ मिळतेच असे नाही.कारण ज्यावेळी शेतकरी आपला माल बाजारपेठेत आणतो त्यावेळी आडती व दलाल यांच्यामुळे त्याला चांगला हमी भाव मिळत नाही .भाजपा सरकारने आडती व दलाल शाही ही नष्ट करून चांगले पाऊल उचले आहे .
महाराष्ट्रातील २९५  कृषी उत्पन्न बाजार समित्यापैकी ३०बाजार समित्यामध्ये या पोर्टल च्या माध्यमातून ई ट्रेडिंग सुविधा उपलब्ध झाली आहे.महाराष्ट्र राज्यातील १४०-१५० कृषी उत्पन्न बाजार समित्यांना( ई नाम )या  राष्ट्रीय कृषी पोर्टलशी जोडण्याची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे .राज्यातील  कृषी उत्पन्न  बाजार समितीची अंदाजे वार्षिक उलाढाल ही ३७००० ते ४०००० हजार कोटी रुपयाच्या घरात आहे .अर्थसंकल्पीय घोषणेनंतर महाराष्ट्र हे सर्वाधिक कृषी मालाची ऑनलाईन विक्री करणारे हे पहिले राज्य आसेल .
राष्ट्रीय कृषी पोर्टला संलग्न असलेल्या उत्तर प्रदेशातील सर्वाधिक कृषी उत्पन्न बाजार आहेत .त्यापाठोपाठ हरियाणा आणि मध्यप्रदेश बाजार समित्या आहेत .

No comments:

Post a Comment