तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

जनसेवेसाठीच शिवसेनेचा जन्म-वैजनाथ सोळंके

माणिकनगर येथे आरोग्य शिबीरासाठी नागरिकांचा मोठा सहभाग

महादेव गित्ते
---------------------------------
परळी वैजनाथ, दि.11
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करण्याचा वसा तमाम शिवसैनिक चालवत असून सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी सर्व शिवसैनिक सदैव तत्पर असल्याचे मत शिवसेना तालुकाप्रमुख वैजनाथराव सोळंके यांनी व्यक्त केले. आज रविवार दि.11 मार्च रोजी परळी शहरातील माणिकनगर येथील संकटमोचन हनुमान मंदिर शिवसेनेच्या वतिने आरोग्य शिबीर घेण्यात आले. यावेळी श्री.सोळंके बोलत होते.

*परळी शहर व तालुका शिवसेनेच्या वतिने दि.10 ते 21 मार्च दरम्यान सुरू असलेल्या भव्य आरोग्य शिबीराचा आज दुसऱ्या दिवशी न्यू माणिकनगर भागातील श्री कल्याणकारी हनुमान मंदिर येथे सकाळी 10 ते 7 वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबीरात 274 रूग्णांनी आरोग्य तपासणी केली आहे. गरजू रूग्णांना तपासणीसोबतच मोफत औषधी वाटप करण्यात आल्या.  यावेळी बोलतांना शिवसेना तालुकाप्रमुख वैजनाथराव सोळंके म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला सध्याच्या काळात आरोग्याच्या दृष्टीकोनातून होणारा खर्च न पेलणारा आहे. आर्थिकदृष्ट्या महागड्या आरोग्य तपसण्या व शस्त्रक्रिया करणे सर्वसामान्य नागरिकांना परवडत नसल्याने उपचाराअभावी व तसेच अज्ञानापोटी मृत्यूला सामोरे जावे लागण्याच्या घटना अनेकदा  घडतात. सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे आणि एखाद्या असाध्य रोगाने ग्रस्त असलेल्या नागरिकास मोफत औषोधोपचार मिळावा, या हेतूने अशा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.या शिबीरात लोककल्याण आरोग्य केन्द मुंबई-ठाणे तो डॉ. शरद चव्हाण डॉ.अनिल चव्हाण डॉ. मुंडे व त्याचे सहकारी यांनी रूग्नांची तपासणी केली

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लिंबाजी दहिफळे, रमेशराव काळे, रविलाल पटेल, पत्रकार संतोष जुजगर, परळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महादेव गित्ते, महेशअप्पा शिंदे, राम परळीकर, शंकरराव गवते, सुनिल देशमुख, वैजनाथ गिरवलकर, काशी बनारसचे धर्मप्रचारक रामलीलाचे संयोजक हरिश्चंद्र उपाध्याय यांच्यासह माणिकनगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख राजेश विभूते, युवा सेना तालुकाधिकारी व्यंकटेश शिंदे, प्रा.अतुल दुबे, शहर उपप्रमुख अभिजीत धाकपाडे, ज्ञानेश्वर जाधव, मोहन राजमाने, सोमनाथ शहाणे, संतोष चौधरी, बालाजी डांगे, हरीभाउ लांडगे, युवराज साखरे, ज्ञानेश्वर गिराम, पप्पू गावडे, निलेश बोटुळे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहरप्रमुख राजेश विभूते यांनी केले. सुत्रसंचलन प्रा.अतुल दुबे तर आभार प्रदर्शन अभिजीत धाकपाडे यांनी मानले.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment