तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 March 2018

श्री रामेश्वर विद्यालय केदारखेडा येथील विद्यार्थिनींना सायकल वाटप

गणेश एन. सोळुंके, (भोकरदन ग्रामीण)
---------------

केदारखेडा : येथील श्री रामेश्वर विद्यालयातील 17 विद्यार्थिनींना मानव विकास मिशन योजने अंतर्गत मोफत सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री रामेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव गिऱ्हे,सचिव केशव पाटील जंजाळ,मुख्याध्यापक एस.एन.बोर्डे, जी.आर.प्रधान, एन.एस.तळेकर,आर.टी.बटुळे, ए.एस.सोनोने,आर.के.जाधव, व्ही.एन.धसाळ,टी.आर.फोलाने, एस.एल.गिऱ्हे,एस.बी.पोटे, के.ए.खेडेकर,ए.एन.सोनवणे, व्ही.यु.तांगडे,एस.एस.आडे, के.के.शोरमारे,आर.डी.पंडीत, व्ही.के.कुदर, गणेश सोळुंके, बी.ए.गायकवाड, मिलींद सावंत, श्रीराम मुरकुटे व पालकांची उपस्थिती होती.

मिरा शेनफड गाडेकर विद्यार्थिनी: मी दररोज शाळेत चार किलोमिटर येणे व जाणे करत होते, त्यामुळे माझा बराच वेळ येण्या-जाण्यामध्येच जात होता. व घरी आल्यानंतर पाई चालुन खुप थकवा येत होता. मला मानव विकास योजने अंतर्गत सायकल मिळाल्यामुळे माझा दोन तास वेळ अभ्यासासाठी शिल्लक देता येईल. मी मानव विकास योजनेचे व शाळेचे खुप-खुप आभारी आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी :गणेश एन. सोळुंके, भोकरदन ग्रामीण.
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं.7888257555
व्हाॅट्स अॅप : 8390132085  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment