तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

शेलगाव येथील गावक-यांचा पाणी फांउडेशन मध्ये सक्रीय सहभाग 


फुलचंद भगत
मंगरूळपीर दि. 14 पाणी फांउडेशन कडून राबविण्यात येणा-या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेकरीता मंगरूळपीर तालुक्यातील शेलगाव येथील पाच ग्रामस्थानचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पडल्या नंतर गावक-यांनी गाव दुष्काळ मुक्त करण्याच्या चळवळीस सुरवात केली असून स्पर्धेच्या पुर्वी करावयाच्या कामास प्रारंभ केला असून गावातील शेतक-यांनी माती परीक्षणाकरीता माती सुध्दा वाशिम येथे पाठविले आहे. 

गावातील पाच वाटर हीरोजने पाणी फांउडेशनचे प्रशिक्षण पुर्ण करून गाव दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प गावक-यांच्या सहकार्याने घेतला आहे. त्या दुष्टीने गावात जलसंधारणाचे कामे करण्याच्या हेतूने गावची शिवार फेरी करून कामाचे नियोजन सुरू आहे. स्पर्धा ही 8 एप्रिल पासून सुरू होणार आहे. त्या दुष्टीने स्पर्धेपुर्वी होणारी कामे यामध्ये शोषखड्डा याला 5 गुन आहेत, रोपवाटीका याला 5 गुण, माती परीक्षण याला 5 गुण, आगपेटीमुक्त शिवार याला 5 गुण, पाणी बचत तंत्रज्ञान याला 5 गुण, अस्तित्वा असलेल्या रचनांचे सर्वेक्षण पाहणी करून रिपोर्ट तयार करणे याला 3 गुण असे 28 गुण मिळविण्याठी गावची जयत तयारी सुरू आहे. या गावातील वाटर हीरोने गावातील 110 शेतक-यांच्या शेतात जावून माती परीक्षणाकरीता माती गोळा करून माती तपासणी करीता आज वाशिम येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आली. 

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment