तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 March 2018

पालम येथे डॉ.झाकिर हुसेन या शाळेत महिला दिन साजरा

अरुणा शर्मा

पालम :- येथे दिनांक 8 मार्च रोजी दुपारी 2 वाजता डॉ. झाकिर हुसेन प्रा.शा. पालम येथे महिला दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक महमद नासेर खॉ यांच्या मार्गदर्शना खाली आयोजीत केला. यावेळी प्रमुख महिला म्हणुन व्यासपिठावर जि.प.सदस्य परभणी मंगलाताई रोकडे, नगर सेविका मालताताई रोकडे, लेडिज पोलीस दिपीका चांदमारे, महिला सुरक्षा समितीच्या अरुणा शर्मा, निखत परविन, उपनगर अध्यक्ष आजुम बेगम व सर्वे सदस्य हाजर होत्या. यावेळी विद्यार्थी  यांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले. निखत परविन व चांदमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सुत्र संचालन सह शिक्षीका निखत फातेमा यांनी केले. आभार गौसिया बेगम यांनी मानले.

No comments:

Post a Comment