तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 1 March 2018

गेवराई येथील गायत्री बाल संस्कार केंद्रात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

सुभाष मुळे....
-------------------------
गेवराई, दि. 1 __ येथील गायत्री बाल संस्कार शाळेत वार्षिक स्नेह संम्मेलन व फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली, लहान लहान मुलांनी विविध वेषभूषा जसे बाल शिवाजी, बाजीराव मस्तानी, झांसी कि राणी, परी, स्वामी विवेकानंद, ऋषि मुनि, स्पाइडर मैन, सिंह, हत्ती, गणपती इत्यादि चे रूप धारण करून सर्वांची मने जिंकली. मामाच्या गावाला जाऊया तसेच मैय्या यशोदा या गीतावर सामुहिक नृत्य सादर केले.
      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. गौरी ठोंबरे व परिक्षक सौ. मनोर मैडम या होत्या. या अतिथिंचे स्वागत संचालिका सौ. सीता महासाहेब यांनी केले. तदनन्तर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. जाधव, सौ. गारपगारे व सेविका कांताबाई झेंडेकर यांनी परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमास विद्यार्थी व पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment