तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

मंगरुळपीर येथील बिरबलनाथ संस्थानकडुन फकीरबाबांचे होणार स्वागत


फुलचंद भगत
वाशिम-जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील पंचक्रोशीत नावाजलेले बिरबलनाथ संस्थानच्या वतीने मुस्लीम धर्माच्या पविञ ऊर्स शरीफला आलेल्या फकीरांचे स्वागत आणी चहानास्ट्याचे आयोजन बिरबलनाथ संस्थानच्या वतीने दि. १५ रोजी ११वाजता करन्यात आले आहे.
           हिंदु-मुस्लीम धर्मीयांच्या एकतेचे आणी बंधुभावनेचे प्रतिक असलेली वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर नगरी आहे.सर्व धर्मीयांच्या सण ऊत्सवामध्ये मोठ्या ऊत्साहाने सामिल होवून सर्वधर्मीय लोक एकता आणी बंधुभावनेचे दर्शन घडवत असतात.अशाच मुस्लीम धर्मियांच्या परीञ ऊर्स शरीफमध्ये नाथ नगरीत आलेले फकीरबाबा यांचे दि.१५ रोजी परतीला लागणार आहेत,त्यानिमित्ताने मंगरुळपीर येथील बिरबलनाथ संस्थानच्या वतीने या सर्व फकीरबाबांचा सत्कार करुन चहानास्ट्याची व्यवस्था करन्यात आली आहे.हिंदुमुस्मीमांच्या या अनोख्या एकतेच्या कार्यक्रमाला बहूसंख्येने ऊपस्थीत राहावे असे आवाहन बिरबलनाथ संस्थानचे सचीव रामकुमार रघुवंशी यांनी केले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment