तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

शेतकर्यांना शेतीमालावर अल्पदाराने तारण कर्ज वाटप

कृषी उत्पन्न बाजार समितीचा महत्वपुर्ण निर्णय .

शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी घेतला योग्य पुढाकार

पाथरी:- शेती मालाच्या काढणी हंगामात बाजारपेठेत शेती मालाची विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आवक येते.पर्यायाने शेती मालाचे भाव कोसळतात व शेतकऱ्यांना नाईलाजाने मालाची विक्री करावी लागते यातून आर्थिक फटका सहन करावा लागतो .या  पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा व आर्थिक गरज भागावी यासाठी शेती मालावर तारण कर्ज देण्याचा उपक्रम कृषी उत्पन बाजार समितीने घेतला असून यामुळे शेतकरी  वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
                  या कृषी मालतारण योजनेअंतर्गत ८मार्च रोजी पाथरी तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर काळे चाटे पिंपळगांव यांनी हरभरा हा माल वेअर हाऊस मध्ये ठेवला आहे मुल्यनिर्धारीत किंमतीच्या ७० % प्रमाणे  तारण कर्ज रू १ लाख ५ हजार  रक्कमे चा धनादेश कृउबास चे सभापती अनिलराव नखाते यांनी देऊन या योजनेचा शुभारंभ केला आहे . यावेळी संचालक नारायणराव आढाव ,रत्नाकर शिंदे,सचिव बी.एस.कुटे लेखापाल के.ए. राऊळ यांची उपस्थिती होती.
            हि योजना उत्पादक शेतकर्यासाठीच असुन शेतकऱ्यांनी  वेअर हाऊस मध्ये त्यांचा माल ठेवला पाहिजे. त्या मालाच्या मुल्यनिर्धारीत किंमतीच्या ७०% रक्कम  हि तारण कर्ज म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ६ महिन्याच्या मुदतीत ६% व्याजदराने रक्कम दिली जाते. व या सहा महिन्यांत जेंव्हा योग्य भाव येईल तेंव्हा शेतकरी
त्यांच्या मालाची विक्री करून कर्ज रक्कम परतफेड करून उर्वरीत रक्कम घेऊ शकतो .
              पीक काढणीच्या हंगामात ग्रामीण भागातून  बाजारपेठेत मालाची आवक मोठ्या प्रमाणात  वाढते त्यामुळे मालाचे भाव कोसळतात परीनामी शेतकर्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते .यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या  माल वेअर हाऊस मध्ये साठवता यावा .व आर्थिक गरज भागावी आणि योग्य भाव आल्यास मालाची विक्री करता यावी यासाठी सभापती अनिलराव नखाते व संचालक मंडळ यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठीच कृषी पणन मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या मालावर तारण कर्ज देण्याची महत्वपुर्ण  योजना कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने राबविण्याचा घेतलेला निर्णय हा शेतकरी हिताचा मानला जातो

अशी आहे योजना.
                           हि योजना उत्पादक शेतकऱ्यांसाठी असुन यामध्ये तुर  मुग ,उडीद ,सोयाबीन ,हरभरा ,करडई ,ज्वारी ,बाजरी मका या शेतीमाला साठी आहे.वेअर हाऊस मध्ये ठेवलेल्या शेती मालाचा बोजा उतरून त्याच्या किंमतीच्या ७०% रक्कम हि ६ महिन्याच्या मुदतीत ६ % व्याजदराने दिली जाते.त्यानंतर शेतकर्यांनी मुदत वाढवून घेतली तर त्यापुढील ६ महिने ८% व त्या पुढील ६ महिने १२% व्याज दर लागू होतो .मात्र शेतकर्यांनी मुदत वाढवून घेतली नाही तर तो तारण ठेवलेला शेती माल कृषी उत्पन्न बाजार समीती विक्री करू शकते.
व त्या रक्कमेतून कर्ज तारण रक्कम वसूल करून उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा करू शकते .

उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा......अनिल नखाते
                             शेतकर्यांना त्यांच्या शेती  मालाला योग्य भाव आल्यानंतरच विक्री करता यावा  व तो पर्यंत त्याची आर्थिक गरज भागावी म्हणून त्याला ६% अल्पदराने तारण कर्ज देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या संमतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला असुन उत्पादक शेतकर्यांनी याचा फायदा घ्यावा असे अवाहन कृउबास सभापती अनिलराव नखाते यांनी केले आहे .

No comments:

Post a Comment