तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

पाणी टंचाई ची कामे आठ दिवसात सुरु करा अन्यथा बैलगाड़ी मोर्चा काढणार


---विजयराव भांबळे

प्रदिप कोकडवार
जिंतुर तालुक्यातील पाणी टँचाई सदृश्य गावात शसनाकडुन ठरवलेली कामे येत्या आठ दिवसात सुरु न केल्यास पशुधन सह शेतकरी गावकरी मजूर यांचा बैलगाड़ी मोर्चा जिंतुर येथे काढण्यात येईल असा ईशारा एका विशेष पत्रकार परिषदेत  जिंतुर सेलू विधानसभा आमदार विजयराव भाबळे यांनी दिला आहे
जिंतुर सेलू तालुक्यात
विहीर दुरुस्ती
टेंकर द्वारे पाणी पुरवठा सुरु करणे
खाजगी विहिरी अधिग्रहण करुन टँचाई गावात पाणी पुरवठा करा अन्यथा भव्य मोर्चा च नियोजन करण्याची तयारी सुरु केली आहे
जिल्हा अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यानी आठ दिवसात उपाय योजना सुरु केली नाही तर
बैल गाड़ी आणि पशुधन सह मोर्चा
काढन्यात येणार आहे
दोन वर्षों पासून  जिंतुर 25 व  सेलू 15 या गावातील
अधिग्रहण विहीर चा मोबदला मिळाला नाही त्या मुळे सदर विहीर मालक शेतकरी विहिरी चे अधिग्रहण करू देण्यास विरोध करत आहेत
इतर जिल्ह्यात पाणी टँचाई ची काम सुरु पण झाली मार्च उजाडला तरी परभणी जिल्ह्यात टँचाई कामे नाहीत म्हणून त्यांनी प्रशासनाची उदासीनता कारणीभूत असून प्रशासनात अधिकारी फक्त भृस्टाचार करण्यासाठी लक्ष घालतात उप जिल्हाधिकारी दर्जा चा व्यक्ति भरदिवसा कार्यलयात लांच  स्विकारतो त्याला भिती वाटत नाही म्हणून आता तालुक्यातील सरकारी कर्मचारी पण लांच घेताना पकड़ले जातात
या गभीर बाबी कड़े जिल्हाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे
गौण खनिज पकड़ूँन दंड आकारणी करने जमते पण ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे अधिकारी करत नाहीत अशी खंत ही व्यक्त केली या पत्रकार परिषद वेळी प्रसादराव बुधवन्त मनोज थिटे,शामराव मते एड विनोद राठोड, शंकर गंजे आदि उपस्थित होते

तेज न्यूज
प्रदिप कोकडवार

No comments:

Post a Comment