तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

राष्ट्रसंतांचे तत्वज्ञान जनमाणसात रुजविण्यासाठी चिंतन शिबीर महत्वाचे


फुलचंद भगत   
मंगरुळपीर-राष्ट्रसंताच्या कार्याचा प्रसार व प्रचार  गुरुदेव प्रेमींनी करावा.गुरुदेव सेवा मंडळाचे माध्यमातुन महाराजांचे कार्य
पुढे न्यावे राष्ट्रसंतांचे तत्वज्ञान जनमानसात रुजविण्यासाठी व सर्वस्तरातील लोकांना सुखी समाधानी व्हावी या साठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे तत्वज्ञान मोलाचे असुन हे तत्वज्ञान जन मानसा पर्यंत पोहोचविण्यासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळा
च्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्ता मेळावा व चिंतन शिबिरे गावोगावी आयोजित करणे  महत्वाचे आहे असे प्रतिपादन अखिलभारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरीचे
सरचिटणीस जनार्धनपंत  बोथे यांनी येथील श्री गुरुदेव कार्यकर्ता
मेळावा व  चिंतन  शिबीराप्रसंगी केले.

शहरातील बिरबलनाथ मंदीरात अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचा  वाशिम जिल्हा कार्यकर्ता मेळावा व चिंतन शिबीर दि.१०मार्च रोजी संस्थानचे सचीव रामकुमार रघुवंशी यांच्या अध्यक्षतेत व
वाशीम जिल्हा सेवाधिकारी सुनिल सपकाळ यांचे मार्गदर्शनात संपन्न
उत्साहात संपन्न झाले.या प्रसंगी अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांची उदघाटक म्हणुन प्रमुख उपस्थिती होती.मंचकावर ग्राम गीता जीवन विकास परिक्षा विभागाचे सचीव गुलाब महाराज खवसे,ह.भ.प.विठ्ठल काठोळे महाराज, अरविंद राठोड गुरुकुंज आश्रम मोझरी, माजी जिल्हा सेवाधिकारी लक्ष्मण आवटे नगर ,ह.भ.प मारोतराव  वाघ,विटकरे महाराज,जिल्हा भजन प्रमुख संजय क्षीरसागर,सिताराम महाराज दबडे जिल्हा किर्तन प्रमुख, अरुण पाटील सेवाधिकारी मानोरा, कारंजा तालुका सेवाधिकारी रवी माहुलकर,महादेव सावके मंगरुळपीर तालुका प्रचारक,मुकुंद दाते मंगरुळपीर तालुका भजन प्रमुख, मंगरुळपीर तालुका सेवाधिकारी विजयपंडीत,सहसेवाधिकारी विजय क्षीरसागर भिमराव डहाणे जिल्हा समिती सदस्य,सुनिल लक्रस भजन प्रमुख वाशीम,रणजीत देवळे वाशिम,माजी जिल्हासेवाधिकारी प्रा.दादाराव पाथ्रीकर,वसंत चिवरकर तालुका प्रचारक,रवि माहुलकर कारंजा तालुका सेवाधिकारी,संजय पठाडे कारंजा तालुका
भजन प्रमुख,सुभाष घुगे मालेगाव तालुका
सेवाधिकारी,रमेश सांगळे(प्रचारक) मालेगाव यांचे सह मान्यवरांची उपस्थिती
होती त्या वेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा राष्ट्रीय थोर पुरुषांच्या शासन यादीत समावेश केल्या बद्दल कार्यकर्त्यांनी शासनाच्या महत्वपुर्ण निर्णयाचे स्वागत केले
"गुरुदेव हमारा प्यारा है जीवन का
उजियारा"या संकल्प गीताने कार्यक्रमाला
सुरुवात करण्यात आली, कार्यक्रमाचे उपस्थितांनी ग्राम दैवत श्री बिरबलनाथ महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतीमा पुजनानंतर कार्यक्रमाध्यक्ष रामकुमार रघुवंशी, नगर उपाध्यक्ष प्रा विरेंद्र सिंह ठाकुर,बाळु दिवेकर,गजानन गिर्डेकर यांनी सरचिटणीस बोथे,ग्रामगीता विभागाचे सचीव खवसे यांचा  तसेच
योगगुरु रामदेव बाबा यांचे हस्ते राष्ट्रीय
युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल निलेश
सोमाणी वाशीम यांचा शाल,श्रीफळ
संत बिरबलनाथ महाराज यांची प्रतिमा
भेट देवुन सत्कार केला.मंगरुळपीर
येथील भजन स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमचे सरचिटणीस
बोथे यांचे हस्ते महीलांना प्रमाण पत्राचे वाटप करण्यात आले.
पारवा येथील बाल गुरुदेव सेवा मंडळाच्या चैताली पाकधने,मेघा लुंगे,ज्ञानेश्वरी सावके, समिक्षा काकड, प्रणाली क्षीरसागर,राजश्री गांजरे यांनी
स्वागत गीत गावुन अतिथींचा सत्कार केला.त्या प्रसंगी वाशीम जिल्हा
सेवाधिकारी प्रा.सपकाळ यांनी
राष्ट्रसंताच्या कार्याचा प्रचार व प्रसार
सर्वव्यापक स्वरुपात होण्यासाठी कार्यकर्ता मेळावा व चिंतन शिबीराचे
आयोजन करण्यात आले असुन असे मेळावे व शिबीर आयोजनात सर्व गुरुदेव प्रेमींचा सहभाग असणे अवश्यक आहे असे मत व्यक्त करुन चिंतन शिबीराचे महत्व सांगुन गुरुकुंज आश्रम येथील अतिथींचा परिचय प्रास्ताविकातुन करुन दिला.ग्रामगीता जीवन विकास परिक्षा विभागाचे सचीव गुलाब महाराज खवसे यांनी ग्रामगीता जीवन विकास परिक्षेचे महत्व पटवुन दिले व आयोजित निबंध स्पर्धेबाबत माहीती दिली.पारवा येथील भाग्यश्री लुंगे हीने राष्ट्रसंत व छत्रपती शिवाजी या विषयावर भाषण केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हासचिव डाॅ.सुधाकर क्षीरसागर व  जिवन प्रचारक रविंद्र वार्डेकर यांनी केले तर आभार गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष गोपाल क्षीरसागर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड.प्रकाश इंगोले डाॅ.दिलीप रत्नपारखी,जयंत जहागीरदार,पुंडलीक पन्नासे सुरेश आमटे,संजीव टोंचर,सुरेश काळे,विजय भोजने,राजेश्वर भोजने नाजुक भडांगे,दिपक पिंपळकर,दिनकर भामोद्रे,यशवंत बासोळे,अशोक शिंदे,बाळु पाटील कळंबा,पप्पु बाहेती,सुधाकर भांडेकर,रमेश नाकाडे,मुकुंदसींह,मुकेश सुखडिया यांचे सह सर्व गुरुदेव प्रेमींचे मोलाचे सहकार्य लाभले.या जिल्हा मेळावा व चिंतन शिबिराला वाशीम,कारंजा (लाड)
मानोरा,मंगरुळपीर मालेगाव येथील तीनशेच्या वर कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.राष्ट्रवंदना व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment