तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

माता पित्याची सेवा करा त्यांना वृध्दाश्रमात पाठवू नका; घरीच भगवंताची प्राप्त होते-ह.भ.प.अर्जुन महाराज लाड गुरुजी


महादेव गित्ते
---------------------------------
परळी वैजनाथ, दि.11
प्रत्येक घर मंदिर झाले पाहिजे त्या मंदिरात माता पित्याची प्रतिष्ठापना केली पाहिजे. रोज माता-पित्याची सेवा करुन मंदिरातील भगवताची पूजा करा माता-पित्याना घरातच ठेवा त्यांना वृध्दाश्रमात पाठवू नका माता-पित्याच्या उपकाराची परतफेड कधीही होत नसते पण आनंदात ठेवा प्रत्येक जीवला भगवंताची प्राप्त होत असते.भक्त पुंडलिकाच्या चारित्रातून हे पहावयास मिळते असे प्रतिपादन ज्ञानेश भक्त आचार्य, व्याकरणाचार्य ह.भ.प.अर्जुन महाराज लाड गुरुजी यांनी केले.

तालुक्यातील हेळंब येथे आयोजित अखंड हरिनाम व ग्रंथराज ज्ञानेश्‍वर पारायण सोहळाया सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमानिमित्त आयोजित काल्याच्या किर्तनात लाड गुरुजी बोलत होते. कितन सेवेसाठी लाड गुरुजी यांनी अभंगवार निरुपण केले. 

मानवी जीवनातील माता-पित्याचे उपकार विषद करुन सांगितले कलियुगात वृध्दाश्रम हा समाजाला लागलेला कलंक आहे. आई-वडीलांच्या म्हतारपणी त्यांना त्रास देवू नका त्यांना आनंदात ठेवा त्याची रोज सेवा करा तुम्हाला भगवंताची प्राप्ती घरीच झाल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन लाड गरुजीनी केले. घर हेच मंदिर सारखे झाल्यावर देव धर्मासाठी इतरत्र फिरण्यासाठी जत्रा मेळाव्यात जाण्याची गरज नाही. घरीच भगवंताची प्राप्ती होत असते. काल्याच्या किर्तनात अर्जुन महाराज लाड गुरुजी, काल्याच्या प्रसादाचे महत्व विषद केले. काला म्हणजे मिलन शिव आणि ब्रम्हाला काला असतो.

परळी तालुक्यातील हेळंब येथै प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण साहेळ्याचे अयोजन करण्यात आले होते. ज्ञानेश्‍वरी व्यासपीठ प्रमुख म्हणून ह.भ.प.वैजनाथ महाराज आंधळे यांनी केले. या अखंड हरिनाम सप्ताह रात्री ९ ते ११ महाराष्ट्रातील प्रसिध्द किर्तनकार दि.०४ मार्च रोजी ह.भ.प.अनंत महाराज हेळमकर, दि.०५ ह.भ.प.विजयानंद महाराज दौनापुरकर, दि.०६ ह.भ.प.भरत महाराज सोडगीर, परळी वैजनाथ, दि.०७ ह.भ.प.अर्जुन महाराज लटपटे, दि.०८ ह.भ.प.नाथराव घरजाळे महाराज गुरुजी, दि.०९ ह.भ.प.कृष्णकांत महाराज सताळकर तसेच दि.१० मार्च रोजी ह.भ.प.व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे काल्याचे किर्तन झाले. तसेच रात्री ९ ते ११ ह.भ.प.बंडोपंत महाराज ढाकणे यांचे किर्तन झाले. 

यावेळी आयोजक समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीन महाराजांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास पंचक्रोशीतील गुणीजन भजनी मंडळी , भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यास समस्त गावकरी हेळंब यांनी परिश्रम घेतले. 

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment