मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Friday, 2 March 2018

शिव सम्राट मित्र मंडळाकडून होळीच्या आणि धूलिवंदन जल्लोषात साजरा


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई :दि २
होळीचा दुसरा दिवस धूलिवंदनाचा दिवस म्हणून ओळखला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस असेही म्हणतात. आणि फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते, तेच धूलिवंदन होय.
मराठी आणि हिंदी सिनेमातील गाण्यांनी तरुणाई बेधुंद होऊन नाचत असतात . मराठी गाणी १. आज गोकुळात रंग खेळतो हरी २. होळींचे सोंग घेऊन... ३. खेळताना रंग बाई होळीचा  हिंदीतील होळीची गाणी १. रंग बरसे भिगे चुनारवाली... २.होली के दिन दिल मिल जाते है ३. बलम पिचकारी तुने मुझे मारी..
आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जपून जा तुझ्या घरी़ हा राधा कृष्णाच्या प्रेमाची रंग बरसात करणारा धुलीवंदन हा भारतीय संस्कृतीत सगळयात मोठा सण आहे. आधुनिक काळात त्याचे रूप पालटले आहे. आणि नैसर्गिक रंगाची जागा रासायनिक रंगानी घेतली आहे. त्यामुळे होळीच्या रंगाचा बेरंग होतो. होळीचा खरा आनंद घेण्यासाठी इको फे्रंडली रंगो से खेलो रे होली, जल्दही ये रंग उतरेगा असे म्हणायची वेळ आली आहे.तरी देखील विविध प्रकराच्या नैसगिक रंगांनी लोक बेरंग होऊन जातात .आणि या नैसर्गिक रंगांनी त्वचेचा ऱ्हास होत आहे .डोळ्यांना इजा होते , त्यामुळे त्वचेचे रोग होत आहेत . शिव सम्राट मित्र मंडळाच्या वतीने विभागीय जनतेला आवाहन केले की  नैसर्गिक रंगाची उधळण करा .रंग खेळताना डोळ्याची काळजी घ्या .त्वचेची काळजी घ्या रासायनिक कलरचा वापर करू नका .आपल्या साठी अहोरात्र ड्यूटी करणाऱ्या पोलिसाना सहकार्य करा मद्य प्राशन करून हुल्लडबाजी घालू नका .
विभागीय जनतेला होळीच्या आणि धूलिवंदनाच्या शुभेछ्या शिव सम्राट मित्र मंडळाच्या वतीने खालील सदस्यांनी दिल्या
विठ्ल खामकर , सुभाष इचके , सतीश भालेराव , सचिन शेवाळे , गौतम कांबळे , राम सरोदे , मारुती सोनटक्के, नरेंद्र दुर्गम , राज कोक्कु , तुषार पवार , अंकुश मुंडे , नितीन गुळवे , पप्पू बोरगे ,

No comments:

Post a Comment