तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 March 2018

होळीच्या आणि धूलिवंदनाच्या विभागीय जनतेस हार्दिक शुभेच्छा : प्रभाग क्रमांक १२९ चे नगरसेवक सूर्यकांत गवळी


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई दि ०२ होळीचा दुसरा दिवस धूलिवंदनाचा दिवस म्हणून ओळखला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस असेही म्हणतात. आणि फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते, तेच धूलिवंदन होय.
मराठी आणि हिंदी सिनेमातील गाण्यांनी तरुणाई बेधुंद होऊन नाचत असतात . मराठी गाणी १. आज गोकुळात रंग खेळतो हरी २. होळींचे सोंग घेऊन... ३. खेळताना रंग बाई होळीचा  हिंदीतील होळीची गाणी १. रंग बरसे भिगे चुनारवाली... २.होली के दिन दिल मिल जाते है ३. बलम पिचकारी तुने मुझे मारी..
आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जपून जा तुझ्या घरी़ हा राधा कृष्णाच्या प्रेमाची रंग बरसात करणारा धुलीवंदन हा भारतीय संस्कृतीत सगळयात मोठा सण आहे. आधुनिक काळात त्याचे रूप पालटले आहे. आणि नैसर्गिक रंगाची जागा रासायनिक रंगानी घेतली आहे. त्यामुळे होळीच्या रंगाचा बेरंग होतो. होळीचा खरा आनंद घेण्यासाठी इको फे्रंडली रंगो से खेलो रे होली, जल्दही ये रंग उतरेगा असे म्हणायची वेळ आली आहे.तरी देखील विविध प्रकराच्या नैसगिक रंगांनी लोक बेरंग होऊन जातात .आणि या नैसर्गिक रंगांनी त्वचेचा ऱ्हास होत आहे .डोळ्यांना इजा होते , त्यामुळे त्वचेचे रोग होत आहेत .प्रभाग क्रमांक १२९ चे नगरसेवक सूर्यकांत गवळी यांनी विभागीय जनतेला आवाहन केले की  नैसर्गिक रंगाची उधळण करा .रंग खेळताना डोळ्याची काळजी घ्या .त्वचेची काळजी घ्या रासायनिक कलरचा वापर करू नका .आपल्या साठी अहोरात्र ड्यूटी करणाऱ्या पोलिसाना सहकार्य करा मद्य प्राशन करून हुल्लडबाजी घालू नका .

No comments:

Post a Comment