तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

युसुफ पुंजानी यांचे नेतृत्वात वाशिम जिल्हा भारिपमय होन्याच्या मार्गावर.....


फुलचंद भगत
वाशिम- जिल्ह्याच्या राजकारणात भारिप बहुजन महासंघाला वरचे स्थान मिळवून देणारे जिल्हाध्यक्ष मो.युसूफ पुंजानी यांची आता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदीही निवड करण्यात आली आहे़ राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड़ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी ही निवड केली आहे. या निवडीसाठी त्यांच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
युसुफ पुंजाणी यांचे नेतृत्वात आता संपुर्ण वाशिम भारिपमय होन्याच्या मार्गावर असुन आगामी वाशिमचे खासदार तथा आमदारकीची माळही भारीप आपल्या गळ्यात घालन्याची स्पष्ट चिन्हे दिसत असुन त्यासाठी पोषक राजकीय वातावरण तयार होत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघात दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळवून युसुफ पुंजानी यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यानंतर  कारंजा नगर पालिकेत भारिप-बमसंची एकहाती सत्ता आली. त्यांच्या नेतृत्त्वात मंगरुळपीर नगरपालिकेतही भारिप-बमसंच्या महिला उमेदवाराने नगराध्यक्ष पदावर आपले नाव कोरले, तर वाशीम नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला होता. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी पक्ष वाढीसाठी स्वत:ला वाहुन घेतले. ठिकठिकाणी मेळावे घेऊन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा जागविली व अनेकांना पक्षप्रवेश घडवून आणला. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर आता भारिप -बमसंच्या जिल्हाध्यक्षपदा सोबतच विश्वासाने महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदाची अतिरिक्त जबाबदारीही टाकण्यात आली आहे. 

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment