तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

बंजारा साहित्य संमेलनातुन एक नवी दिशा मिळेल: रोहिदास पवार

महादेव गित्ते
---------------------------------
औरंगाबाद, दि.12
   मुंबई येथे 29 ते 30 मार्च रोजी 5वा अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन डोंबिवली मुंबई आयोजित करण्यात आले आहे. बंजारा समाजातील लोकांमधे समाजाच्या साहित्य विषयी माहिती जनजागृती करण्याची काळाची गरज आहे. साहित्यतुन बंजारा समाजाला  एक नविन दिशा निर्माण होईल असे मत राष्ट्रीय बंजारा मिशन चे प्रदेश अध्यक्ष रोहिदास पवार यांनी दिलेल्या पञकाव्दारे म्हटले आहे. समाज एक गतीशिल व सुसंस्कृत निर्माण होईल. साहित्य संमेलन म्हणजे समाजातील विद्वान् जेष्ठ व थोर अभ्यासक तसेच समाजाचा इतिहास ही कायम विस्मरणात लक्षात  आसेल व मोठ्या मोठ्या साहित्यिक मंडळीचे मार्गदर्शन, विचार ऐकण्याची संधी बंजारा बांधवांना मिळेल. साहित्य संमेलनात समाजातील युवा साहित्यिकाना आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळेल हि शुद्ध  एक काळची गरज आहे  असुन या कडे बंजारा बांधव गांभीर्य पुर्वक रित्या बघणे आज काल काळाची गरज आहे.साहित्य संमेलनातून ताड्यातले व ग्रामीण , जंगलातील भागातील बंजारा युवा, प्रोढ,सामाजिक कार्य ला एक आवड निर्माण होईल. यामुळे बंजारा समाजाचा इतिहास माहिती व अभ्यासाला निर्माण होईल यातुन युवा साहित्यिक पण घडु शकतात. या साठी  औरंगाबाद जिल्ह्यातील तमाम बंजारा बांधव या येईल त्या साहित्य संमेलन हजारो च्या संख्येने सहभाग रहावे असे आवाहन राष्ट्रीय बंजारा मिशन चे  प्रदेश अध्यक्ष रोहिदास पवार सह संतोष चव्हाण राष्ट्रीय महासचिव, विलास पवार जिल्हा अध्यक्ष, गणेश राठोड जिल्हा उपध्यक्ष ,नारायण चव्हाण जिल्हा महासचिव, राहुल जाधव शहर उपध्यक्ष ,गोरख चव्हाण पैठण तालुका अध्यक्ष, किशोर राठोड कन्नड तालुका अध्यक्ष, मदन चव्हाण, संदिप  आडे, इतर कार्यकर्ता यांनी केला आहे.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment