तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 March 2018

रेणापुर येथील सरस्वती कोचिंग क्लासेस मध्ये बक्षिस वितरण व निरोप  समारंभ संपन्न.

पाथरी:-तालुक्यातील रेणापुर येथील सरस्वती कोचिंग क्लासेसच्या वतीने बक्षिस वितरण व निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतिश घुबरे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण काळे सर,महेश चव्हाण सर,गोपाल आम्ले सर,प्रल्हाद शिंदे सर,विष्णू वाघमारे सर,कृष्णा टेंगसे सर,सरस्वती कोचिंग क्लासेसचे संचालक संदिप टेंगसे सर हे होते.
         कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजन व जिजाऊ प्रतिमेच्या पुजनाने झाली.इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गित सादर केले.स्वागत गितानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात जिजाऊ गायकवाड,ऐश्वर्या रोकडे व मोहिनी टेंगसे यांना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.विद्यार्थ्यांच्या मनोगतामध्ये अभिषेक टेंगसे,भाग्यश्री घाडगे,मनिषा उजगरे,प्रदिप टेंगसे,जिजाऊ गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांच्या मनोगतानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचा समारोप अध्यक्षिय भाषणाने झाला.
         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड याने,प्रास्ताविक संदिप टेंगसे यांनी तर आभार निकिता सरोदे हिने मानले.कार्यक्रमासाठी क्लासेसचे सर्व विद्यार्थी,विद्यार्थीनी व गावातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment