तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित ट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीग स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई : दि १२ मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित ट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीग स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत मुंबईतील सहा संघांचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएलच्या धर्तीवर ट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीगचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईतील स्थानिक खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ मिळणार आहे.
11 ते 21 मार्चदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेतील सर्व सामने मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारे रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, तसंच युवा संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ हेसुद्धा वेगवेगळ्या संघातून सहभागी होत आहेत.
मुंबई क्रिकेटमधल्या स्थानिक स्पर्धांचा ढाचा हा भारतीय क्रिकेटमध्ये मजबूत मानला जातो. पण अशा स्पर्धांमधून खेळाडूंना आर्थिक लाभ होत नाही. ट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीगमधून खेळाडूंना थेट आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा या टी ट्वेन्टी मुंबई लीगचा ब्रॅण्ड अँबेसेडर आहे. लीग कमिशनर म्हणून दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment