तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 March 2018

शेवगाच्या झाडावरून पडल्याने शेतकरी खरात यांचे निधन सेलू तालुक्यातील जीवाजी जवळा येथील घटना


सेलू:प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील  जीवाजी जवळा येथील शेतक-याचे शेवग्याच्या झाडावरून पडल्याने निधन झाल्याची घटना शुक्रवार दि. २मार्च रोजी ११वाजता घडली.याबाबतची माहिती याप्रमाणे जवळा जीवाजी येथील शेतकरी उध्दवराव विठ्ठलराव खरात वय ( ५०) वर्षे हे आपल्या शेतामध्ये असलेल्या शेवग्याच्या झाडावरून १० फुट उंचीवरून खाली जमिनीवर पडले.तेंव्हा डोक्याला दगड लागल्यामुळे बेशुद्ध पडले.त्यांना तात्काळ परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यातआले.प्रकृती खालवल्यामुळे लगेच नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया केल्यानंतर मेंदू मृत आढळून आला यातच शुक्रवार दि. २मार्च रोजी रात्री ११च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर मुळगावी जवळा जीवाजी येथील शेतामध्ये शनिवारी दुपारी ११वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,३मुली  १मुलगा सुना-नातवंडे असा परिवारआहे.

No comments:

Post a Comment