तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

पालम लोहा रोडवर भीषन अपघात जागीच दोन ठार दोन जखमी


अरुणा शर्मा

पालम :- लोहा ते पालम महामार्गवर पालम पासुन जवळ आसलेल्या आजनवाडी जवळ बोलेरो पिकप MH 26 BE 0975 व होन्डा शाईन MH 22 AK 5439 या दोघाची समोरा समोर टक्कर होऊन जागेवर मोटार सायकल स्वार उध्दव बालासाहेब सुर्यवशी वय 35 व त्याचा सात वर्षाचा मुलगा गणेश उध्दव सुर्यवशी हे दोघे जागीच ठार झाले. व दुसरा मुलगा व आई यांना शासकिय दवाखाना नांदेड येथे हालवन्यात आले आहे. त्यांची प्रक्रती चिंता जनक आल्याचे कळते. तर मोटार सायकलवर नवरा बायको व 2 मुले हे रा.निळा ता. पुर्णा जि. परभणी येथील आसुन ते निळा येथुन लग्नासाठी निघाले होते. मात्र दिनांक 12 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता टक्कर लागली. व बोलोरा पिकम हया गाडी मध्ये लग्नाचे वराड घेऊन फुलवल ता.कंधार येथुन गंगाखेड कडे वराड घेऊन निघाला होता. हा आपघात होताच बोलोरा पिकने हि गाडी न थांबता ती सुसाट वेगाने पालम कडे पळविली मात्र आंजनवाडी येथील युवक नितीन पळसकर याने पालम येथे मित्राना संर्पक करून गाडी धरण्यास सांगीतले गाडी पालम च्या बसस्थानका वरून भरधाव गंगाखेड कडे निघाली आसता हे बालाजी सुरनर यांनी त्या बोलोरो पिकम च्या मागे मोटार सायकल लाउन स्व:ताचे जिव धोक्यात घालून तत्बल नऊ किलो मिटर अंतरावर जाऊन केरवाडी पाटी जवळ पकडले व काही वेळात पालम पोलीसाच्या स्वाधीन गाडी व शिवदास लक्ष्मण जाधव रा.केवळा नाईक तांडा ड्राव्हर असुन पुढील तपास चालु आहे.

No comments:

Post a Comment