तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

शंभर टक्के कर भरणा-या ग्रामस्थांना मिळणार वर्षभर मोफत दळण

किरण घुंबरे पाटील

कान्सूर ग्रा.पं. चा उपक्रम;आर.ओ.फिल्टर प्लँटचा लाकार्पण सोहळा.

पाथरी:-तालुक्यातील कान्सूर ग्रांमपंचायत नियमित नवनविन लोकोपयोगी उपक्रम राबवत ग्रामस्थांना सेवा देत असते.या वेळी जे ग्रामस्थ शंभर टक्के ग्रा पंच्या  करांचा भरणा करतील अशांना वर्षभर दळन मोफत देण्याचा पाथरी तालुक्यात प्रथमच उपक्रम राबवत असून या सोबतच ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत सर्वां साठी ऊभारण्यात आलेल्या आर .आे प्लँट चे उदघाटन आ बाबाजानी दुर्रांनी यांच्या शुभ हस्ते १८ मार्च गुडी पाडव्या दिवशी संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी जि प सदस्य सुभाषराव कोल्हे हे राहाणार असून प्रमुख उपस्थितीत जि प उपाध्यक्षा भावनाताई नखाते, कृऊबास सभापती अनिलराव नखाते, जि प चे माजी सभापती दादासाहेब टेंगसे, जि प सदस्य कुंडलिकराव सोगे, माजी जि प सदस्य चक्रधरराव उगले, कृउबास चे माजी सभापती माधवराव जोगदंड, पं स सभापती शिवकन्या ढगे, उप सभापती रमेश तांगडे, पं स गट नेते धर्मराज हिवरकर, गट विकास अधिकारी बि टी बायस यांची उपस्थिती राहाणार आहे या कार्यक्रमा साठी उपस्थीत राहाण्याचे आवाहन कृउबास चे उप सभापती एकनाथराव शिंदे, सरपंच संदिप शिंदे, उप सरपंच अनंत काकडे, ग्रामसेवक आर आर मानोलीकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment