तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 March 2018

विद्यार्थ्यांनी ज्ञानी व यशस्वी बनावे यातच शिक्षकाचा

अभिमान - प्राचार्य डॉ. बडदे
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
देवणी : येथिल कै. रसिका महाविद्यालयात  बी.कॉम. व बीएस्सी शाखेतील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कुणाल बडदे होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थी हा ज्ञानी बनावा तसेच आयुष्यात यशस्वी बनावा असे प्रतिपादन  केले. मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते.
कै. रसिका महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कुणाल बडदे हे होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थी हा ज्ञानी व यशस्वी बनावा ही कोणत्याही शिक्षकांची इच्छा असते. त्यानुसार आपण बनावे असे मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. शिवाजी सोनटक्के प्रा अंकुश भुसावळे प्रा महादेव टेंकाळे,प्रा. प्रशांत भंडे, प्रा डॉ गोपाल सोमानी डॉ सचिन चामले डॉ पी.आर. मोरे, विद्यार्थी  संसद  सचिव  कु  ईसाळे  चारूशिला यांची उपस्थिती होती. प्राचार्य  डॉ कुणाल   बडदे  सरांनी  विद्यार्थ्यांना सविस्तर  मार्गदर्शन  केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसगल्ले रुचिता यांनी केले. आभार माने यांनी मानले. यावेळी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा महाविद्यालयास भेट दिली.

No comments:

Post a Comment