तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

दर्जेदार मराठी चित्रपट निर्माण व्हावेत, यासाठी प्रोत्साहन म्हणून अर्थसाहाय्य मंजूर करण्याची शासनाची योजना आहे


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई :दि. १५ मराठी चित्रपटसृष्टीचा सर्व बाजूंनी विकास व्हावा, यासाठी सर्वतोपरी साहाय्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. दर्जेदार मराठी चित्रपट निर्माण व्हावेत, यासाठी प्रोत्साहन म्हणून अर्थसाहाय्य मंजूर करण्याची शासनाची योजना आहे.
सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात असे अर्थसाहाय्य देण्यासाठी पात्र चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ही निवड करणाऱ्या चित्रपट परीक्षण समितीने २३ चित्रपटांची निवड केली आहे. त्यामध्ये ‘अ’ दर्जा प्राप्त तीन चित्रपट आणि 'ब' दर्जा प्राप्त वीस चित्रपट आहेत. चित्रपटांचा दर्जा ठरविण्यासाठी कथा, दिग्दर्शन, गीत/संगीत, छायाचित्रण, कलादिग्दर्शन, अभिनय, चित्रपटाचा आशय या बाबी विचारात घेण्यात आल्या. ‘अ’ दर्जा प्राप्त करणाऱ्या चित्रपटांना प्रत्येकी ४० लाख रुपये आणि ‘ब’ दर्जा प्राप्त करणाऱ्या चित्रपटांना प्रत्येकी ३० लाख रुपये एवढे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात येते.
मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांना जे अर्थसाहाय्य मंजूर झाले तो धनादेश वितरण कार्यक्रम आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न झाला.
मराठी चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत, लोकप्रिय व्हावेत यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून मराठी चित्रपट निर्मात्यांनी प्रमोशन करणे अत्यंत गरजेचे आहे.
या कार्यक्रमास दादासाहेब फाळके चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज आणि अनेक चित्रपटांचे निर्माते उपस्थित होते. ‘अ’ दर्जा प्राप्त चित्रपटांमध्ये 'कॉफी आणि बरंच काही', 'नटसम्राट-असा नट होणे नाही', 'किल्ला' या चित्रपटांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment