तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

७४७७७२२४२४ या नंबर वर संकट ग्रस्त महिलानी संपर्क करा --विजया ताई रहाटकर

प्रतिनिधी

जिंतुर:-जर तुम्ही संकटात सापडला आहात, कौटुंबिक अत्याचाराला बळी पडत आहात, कार्यालयामध्ये लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागत आहे, किंवा अन्य कोणताही अत्याचार तुम्ही सहन करीत आहात... आणि या सर्वांमुळे तुम्ही नैराश्यग्रस्त आहात, तुम्हाला मदत आणि मार्गदर्शनाची गरज भासते आहे... तर मग सर्वांत वर नमूद केलेला मोबाइल क्रमांक जरूर लक्षात ठेवा.
७४७७७२२४२४ हा क्रमांक आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या हेल्पलाइनचा. तिचे नाव 'सुहिता'. तुम्हाला धीर देण्यासाठी, कायद्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमचे समुपदेशन करण्यासाठी आजपासून (८ मार्च २०१८) म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सुमुहूर्तापासून सज्ज झालीय...
मुंबईत आयोगाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये आयोगाच्या अध्यक्षा मा. विजया रहाटकर यांच्याहस्ते ती विधिवत कार्यान्वित झाली आहे... ती मराठी व हिंदी भाषेतून असेल आणि हो, ती तूर्त तरी कार्यालयीन वेळेतच चालू राहील.
बहिणींनो, तुमच्यावर कोणतेही संकट न येवो. तुम्हाला कोणत्याही अन्यायाला अथवा अत्याचाराला तोंड देण्याची वेळ न येवो; पण दुर्दैवाने ती तशी आलीच तर आयोग हेल्पलाइनच्या माध्यमातून तुम्ही धीर द्यायला, मार्गदर्शन करायला सज्ज आहेच...
लक्षात ठेवा ७४७७७२२४२४ 
तेज न्यूज
प्रदिप कोकडवार

No comments:

Post a Comment