तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

परमेश्‍वर चिंतनाने आयुष्याच्या संधीचे सोने करा-फफाळ महाराज


गंगाखेड-

या सृष्टीत ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू-शेवट अटळ आहे. जीवन जगत असताना सत्कार्याने, सत्कर्माने आपले जीवन जगून परमार्थाचे नामस्मरण करा, जीवनाच्या अंतकाळी परमेश्‍वर चिंतनाने मोक्ष मिळतो. आयुष्याच्या अंतकाळी नुसत्या परमेश्‍वर चिंतन, नामस्मरणाने जर मोक्ष मिळत असेल तर परमेश्‍वर चिंतन करून मानवरूपी आपल्या आयुष्यात  संधीचे सोने करून घ्यावे असे प्रतिपादन रामायणाचार्य-भागवताचार्य ह.भ.प. श्री नामदेव महाराज  फफाळ यांनी गंगाखेड येथे आज बुधवार (दि.14) रोजी पूजा मंगल कार्यालय येथे कीर्तनप्रसंगी केले.

नगरसेविका सौ. सावित्रा त्रिंबकेश्‍वर गुडे यांचे सासरे कै. रघुनाथराव गुडे (गुरुजी) यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या “क्षणोक्षणी हाचि करावा विचार, तरावया पार भवसिंधू ॥ नाशिवंत देह जाणार सकल, आयुष्य खातो काळ सावध ॥ या अभंगावर फफाळ महाराज निरुपण करत होते.

ते पुढे म्हणाले, संत-महात्मे, विद्वान माणसे जीवन जगत असताना मरणाची आठवण ठेवून जीवन जगले, त्यामुळे आजच्या धकाधकीच्या आणि भौतिक सुखसुविधांच्या धावपळीच्या काळात दररोज एकदा तरी मरणाची आठवण करावी असेही फफाळ महाराज यांनी यावेळी सांगितले. 

याप्रसंगी सुदाम महाराज इळेगावकर, मदन महाराज पटांगे, बळीराम महाराज चिकटेवाडीकर, मृदंगाचार्य गोविंदबुवा  दत्तवाडीकर, डॉ. मनिष बियाणी, डॉ. गुंडरे, गंगाखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष शंकर इंगळे, राधाकिशन राखे, प्रा. सुधाकर चिताडे, दत्तराव कातकडे, जगन्नाथ राचुरे, डॉ. त्रिंबकेश्‍वर गुडे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका सौ.  सावित्रा गुडे, प्रा. सावित्रा हरिदास आदी मान्यवरांसह महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment