तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

कामरगाव येथे शेतकर्‍याची आत्महत्या

वाशिम-जिल्ह्यातील कामरगाव येथील शेतकरी धनराज श्यामराव लाकडे वय-४५ या शेतकर्‍यांने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.धनराज यांचेजवळ दोन एकर शेती असुन ही शेती कामरगाव शिवारात आहे.
        शुभम लाकडे यांच्या फिर्यादीवरुन त्यांचे वडील धनराज श्यामराव लाकडे हे शेतात कामाला जातो असे सांगुन घरुन सकाळी दहा वाजता शेतात गेले तसेच आई व बहीणी गावी गेल्याचे पाहुन कर्जाच्या विवंचनेत तसेच पिक समाधानकारक न झाल्याने या चिंतेत गळफास घेवुन आत्महत्या केली.धनराज यांचेवर सेवा सहकारी सोसायटी कामरगावचे १३ हजार रुपये कर्ज असल्याचे समजते.त्यांचे पश्चात विधवा वृध्द आई,पत्नी,मुलगा व दोन मुली असा परिवार असुन घरची परिस्थीती हलाखीची असुन आणी कर्जाच्या चिंतेत आत्महत्या केल्याचे कळते.शुभम लाकडे यांच्या फिर्यादीवरुन मर्ग दाखल करन्यात आला असुन पुढील तपास पोलिस ऊपनिरिक्षक राहूल गुहे हे करीत आहेत.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment