तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारची समिती


प्रतिनिधी :बाळासाहेब राऊत
मुंबई -दि १२ अखिल भारतीय किसान सभेच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने ६ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, अदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे.
ही समिती किसान सभेच्या वेगवेगळ्या मागण्यांवर सभेच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करेल. चर्चेतून तोडगा काढण्याची जबाबदारी ही या समितीवर मुख्यमंत्र्यांनी सोपवली आहे.अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने विधानभवनावर काढण्यात आलेला मोर्चा आज मुंबापुरीत दाखल झाला. या मोर्चाला भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारने या समितीची स्थापना केली आहे.

No comments:

Post a Comment