तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

लोकशाहीत महिलांचा सहभाग मोलाचा- तहसीलदार संजय पवार


सुभाष मुळे....
---------------------
गेवराई, दि. 12 __ भारतीय लोकशाही बळकट होण्‍यासाठी मतदान प्रक्रीयेत महिलांचा सहभाग हा मोलाचा ठरतो असे प्रतिपादन तहसीलदार संजय पवार यांनी केले आहे.
        मा.भारत निवडणूक आयोगाचे निदेशाप्रमाणे व मा.एम.डी.सिंह, जिल्‍हाधिकारी बीड यांचे मार्गदर्शनानुसार गेवराई विधानसभा मतदार संघात 8 मार्च 2018 रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रम मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. गेवराई तालुक्‍यातील 273 मतदान केंद्रावर आणि तालुक्‍यातील माध्‍यमिक शाळा व महाविद्यालयात महिला दिनाच्‍या कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने महिला मतदारांमध्‍ये जनजागृती व्‍हावी या उद्देशाने रांगोळी स्‍पर्धा, वक्‍तृत्‍व स्‍पर्धा व निबंध स्‍पर्धा आयोजीत करण्‍यात आल्‍या होत्‍या. गेवराई शहरातून सकाळी महिला व विद्यार्थीनींची प्रभातफेरी काढण्‍यात आली. यामध्‍ये शारदा विद्या मंदिर, विमला विद्या मंदिर, सेंट झेवियर्स स्‍कूल, कै.वंचळाबाई घुमरे डी.एड.विद्यालय इत्‍यादी शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. दरम्यान हा मुख्‍य कार्यक्रम तहसील कार्यालय गेवराई येथे संपन्‍न झाला. यात सर्वप्रथम राष्‍ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्‍या प्रतिमेला उपस्थित महिलांनी अभिवादन केले. उत्कृष्‍ठ कार्याबद्दल श्रीमती विमलबाई धापसे या महिला कर्मचारी यांचा जाहीर सत्‍कार करण्‍यात आला. नवीन महिला मतदारांचे स्‍वागत करुन मतदार ओळखपत्राचे व मतदार नोंदणी फॉर्मचे वितरणही करण्‍यात आले. सहस्‍त्रक मतदार अंजली राम पवार हीस मतदार ओळखपत्र घरपोच देऊन सन्‍मानीत करण्‍यात आले. महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्‍यासाठी तालुक्‍यातील मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांनी महिलांची मतदार नोंदणी वाढवावी व आपले यादी भागातील विवाह होऊन इतरत्र गेलेल्‍या महिलांची नावे वगळण्‍याची कार्यवाही करावी तसेच नव्‍याने विवाह होऊन आलेल्‍या महिलांची नावे मतदार यादीत समाविष्‍ठ करावीत अशा सुचना तहसीलदार यांनी दिल्‍याबाबत सांगितले.
      कार्यक्रमात श्रीमती सपना वाघमारे, श्रीमती के.आर.कुलकर्णी, प्रज्ञा वानखेडे, श्रीमती पुसनाके व श्रीमती शारदाताई धुमाळ यांनी आपले महिला दिन व मतदार जागृती संदर्भात आपले विचार व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती वर्षा कणके यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती जे.एन.टाक यांनी केले. याप्रसंगी मोठया प्रमाणात महीलां सहभागी झाल्‍या होत्‍या.
तेजन्यूज....✍
╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment