मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Saturday, 3 March 2018

  परळी तालुक्यातील सर्व कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिस्कारात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत.  

परळी वैजनाथ ता.०३ (बातमीदार)

                                                             राज्यातील बारावीच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची शक्यता आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार टाकल्यामुळे बारावीच्या विविध विषयांच्या तब्बल 80 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत.शिक्षक महासंघ आणि शिक्षणमंत्री श्री.विनोद तावडे यांच्यात झालेल्या बैठकीत काही निर्णयांवर शासन आदेश काढण्यात आले. मात्र शिक्षक संघटनांनी महत्वाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.या बहिष्कारात परळी तालुक्यातील सर्व कनिष्ट महाविद्यालयातील शिक्षक सहभागी झाले असल्याचे येथील कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे (जुक्टा)परळी तालुका अध्यक्ष प्रा.सुनिल लोमटे यांनी शनिवारी (ता.०३) सांगितले आहे.

बारावीच्या निकालाला उशीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच आता पुढाकार घेत, राज्यातील १५ लाख विद्यार्थी आणि ७२ हजार शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांनी पत्राद्वारे केली आहे.शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश न काढल्याने प्राध्यापकांनी बारावीचा एकही पेपर तपासला नाही. त्यामुळे पेपर तपासणीचं कामकाज पूर्णपणे ठप्प आहे.शासनाने तातडीने आदेश न काढल्यास निकालावर झालेल्या परिणामाला सरकार जबाबदार असेल, असंही संघटनेने म्हटलं आहे. शिक्षणमंत्री दाद देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा अशीही मागणी करण्यात येत आहे.न्यालयाच्या नुसार पाच जूनपूर्वी बारावीचा निकाल लावणं आवश्यक आहे.जोपर्यंत मुख्य मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संप मागे घेतला जाणार असा निर्धार येथील कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षकांनी केला आहे.

No comments:

Post a Comment