तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 15 March 2018

मंगरुळपीर येथे हिंदुमुस्लीम एकतेचे घडले दर्शन


फुलचंद भगत
वाशिम-जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील पंचक्रोशीत नावाजलेले बिरबलनाथ संस्थानच्या वतीने मुस्लीम धर्माच्या पविञ ऊर्स शरीफला आलेल्या फकीरांचे स्वागत आणी चहानास्ट्याचे आयोजन बिरबलनाथ संस्थानच्या वतीने दि. १५ रोजी ११वाजता करन्यात आले होते.
           हिंदु-मुस्लीम धर्मीयांच्या एकतेचे आणी बंधुभावनेचे प्रतिक असलेली वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर नगरी आहे.सर्व धर्मीयांच्या सण ऊत्सवामध्ये मोठ्या ऊत्साहाने सामिल होवून सर्वधर्मीय लोक एकता आणी बंधुभावनेचे दर्शन घडवत असतात.अशाच मुस्लीम धर्मियांच्या परीञ ऊर्स शरीफमध्ये नाथ नगरीत आलेले फकीरबाबा यांचे दि.१५ रोजी परतीला लागणार आहेत,त्यानिमित्ताने मंगरुळपीर येथील बिरबलनाथ संस्थानच्या वतीने या सर्व फकीरबाबांचा सत्कार करुन चहानास्ट्याची व्यवस्था करन्यात आली.यावेळी बिरबलनाथ महाराज संस्थानचे सचिव रामकुमार रघुवंशी, ऊत्तम पाटील,मुकुंदसींह रघुवंशी, दिनेश बोरकर,राजुभाउ खंडेतोड,योगेश रघुवंशी, बाबा जहागीरदार ईत्यादींची उपस्थिती होती.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment