तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

परळी येथील आरोग्य शिबीर उद्धव ठाकरे यांनी दिलेली सामान्य रूग्णांसाठीची संजिवनी होय-भोजराज पालीवाल


आरोग्य शिबीर शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारणाची पावती-वैजनाथ सोळंके

मोंढा परिसरात दिवसभरात 351 रूग्णांची तपासणी

महादेव गित्ते
---------------------------------
परळी वैजनाथ, दि.12

ग्रामिण भागात वैद्यकिय सुविधा व उपचारांचा मोठा अभाव असून अशा परिस्थितीत अनेक रूग्णांना आपल्या आजारांवर योग्य उपचार मिळत नाहीत अशी अनेकांची खंत होती. ज्याप्रमाणे वनवासात लक्ष्मणाला हनुमानाच्या माध्यमातून संजिवनी मिळाली आणि लक्ष्मण नव्या उमेदीने रामाच्या बरोबरीने उभे राहिले अगदी याच पद्धतीने परळी शहर आणि तालुक्यातील सर्वसामान्य रूग्णांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हनुमान ठरले असून त्यांनी या सर्वांसाठी तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता करून देत संजिवनीच दिली आहे असे मत शिवसेना माजी शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांनी व्यक्त केले.

शिवजयंती निमित्त तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ परळी तालुक्यात होत असलेल्या आरोग्य शिबीराच्या उदघाटन प्रसंगी भोजराज पालीवाल बोलत होते. आज सोमवार हा बाजाराचा दिवस असून यादिवशी सुमारे 351 रूग्णांची तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून करण्यात आली.

यावेळी आरोग्य शिबीराचे  मुख्य संयोजक  शिवसेना तालुकाप्रमुख वैजनाथ सोळंके म्हणाले कि, शिवसेना व आम्ही 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करीत असून आमची नाळ या समाजासोबत जुळली असल्याने त्यांच्या आरोग्यासाठी मुंबई-ठाणे येथील डॉक्टरांच्या हस्ते रूग्णांची तपासणी करीत आहोत. हे शिबीर सामान्यांसाठी अत्यंत महत्वाचे असून डोळयांची तपासणीसह विविध उपचार येथे उपलब्ध करून देण्याचे यावेळी वैजनाथ सोळंके म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संकटमोचन हनुमान  विधीवत पुजन करण्यात आले .तसेच व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचेही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. आज सोमवार दि.12 मार्च रोजी परळी येथील मोंढा मार्केट भागातील संकटमोचन हनुमान मंदिर येथे शिवसेनेच्या वतिने  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ भव्य आरोग्य शिबीराचे शिवसेना बीड जिल्हा, परळी तालुका व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई-ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाचे मुख्य संयोजक शिवसेना तालुकाप्रमुख वैजनाथ सोळंके, शहरप्रमुख राजेश विभूते े यांच्या सौजन्याने या शिबीरात विविध आरोग्य चिकित्सा नेत्र परिक्षण, अल्पदरात चष्मा तसेच गरजूंना मोफत औषधी वाटप करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष भाऊराव भोयटे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना माजी शहरप्रमुख भोजराज पालीवाल, संकटमोचन हनुमान मंदिराचे विश्वस्त पांडुरंग सोनी, ओमप्रकाश भुतडा, बंग सर,जुगल सारडा, गिरीधरीलाल  मल, मुरली सारडा, जयप्रकाश काबरा,  व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानोबा माउली फड, डॉ.अनिल चव्हाण, शिवसेना माजी तालुकाप्रमुख जगन्नाथ साळुंके, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र परदेशी, भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख महेश उर्फ पप्पू केंद्रे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना उपशहरप्रमुख वैजनाथ माने, प्रकाश साळुंके, नरहरी सुरवसे, बाळू देशमुख,संजय गावडे,विशाल सुगरे,शिवाजी दराडे, हरी धामण आदींनी परिश्रम घेतले. 

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment