तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणी करा


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई,दि.१२ जन जागृती फाऊंडेशनच्या वतीने संत श्री नारायण महाराज तारखेश्वर गड यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा दि.२७ एप्रिल रोजी स्थळ सिम्पलेक्स मैदान,सेक्टर ७,नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेजवळ,घणसोली,नवी मुंबई येथे सकाळी ९ ते ११ ह.भ.प.डाॅ.रघुनंदन महाराज गर्जे,उल्हासनगर यांचे काल्याचे कीर्तन होईल.नंतर ११:४९ वाजता सामुहिक विवाह सोहळा संपन्न होईल.व विवाहानंतर वधू वरांचे त्यांच्या धर्मानुसार विधी पार पाडले जातील व भाविक भक्तांना व वराडी मंडळींना भोजनाची सोय करण्यात आलेली आहे.तरी या कार्यक्रमाचे मार्गदर्शक मा.डाॅ बाळासाहेब लाड यांनी सांगितले की,या शाही विवाहसोहळ्यास गोर-गरीब,मुला-मुलींसाठी प्रवेश नि.शुल्क असून ईच्छुक वधु-वरांनी नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी करण्यासाठी मा.श्री.मोहन उत्तम गित्ते अध्यक्ष:मो.९७०२१४११८८,मा.श्री.अर्जुन उत्तम डोंगरे संस्थापक सचिव:मो ७५०६१९२७२७/९७०२०१०७९७,मा.श्री.सुरेश महाराज बडे मो.८१०८२३९९३३,मा.श्री.डाॅ.बाळासाहेब लाड मार्गदर्शन मो.८३५६८३७२७१,मा.श्री.अशोक जायभाये मो.८१०८९७८२४१ व मा.श्री.जयचंद गायकवाड मो.९६९९००९४२६ इ.व्यक्तिंशी संपर्क साधावा.तसेच वधु वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.प्रमुख उपस्थिती मा.ना.पंकजाताई मुंडे-ग्राम विकास,महिला व बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य,मा.खा.डाॅ.प्रितमताई मुंडे-खासदार बीड लोकसभा,मा.श्री.गणेशजी नाईक साहेब ,मा.पालकमंत्री ठाणे जिल्हा इ.तसेच अनेक प्रख्यात मान्यवर या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment